औषध विक्रेत्याला अकबरनगरात लुटले

0

68 हजाराचे ऐवज लंपास : लुटेरे पसार

अहमदनगर (प्रतिनिधी) – औरंगाबाद रस्त्यावरील अकबरनगर परिसरात भररस्त्यात औषध विक्रेत्याला लुटण्यात आले. पोलिसांनी अज्ञात लुटेर्‍यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काल सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.

अतुल बाबासाहेब हिंगे (रा. निर्मलनगर) असे लूट झालेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. हिंगे यांचे भिंगार येथे औषध विक्रीचे (मेडिकल) दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते घरी जात होते. जाताना ते तारकपूर बसस्थानकते चहा पिण्यासाठी थांबले.

चहा पिल्यानतंर औरंगाबाद रोडच्या दिशेन दुचाकीवरून घरी जाण्यास निघाले. लक्ष्मीमाता मंदिरासमोर विना नंबरच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी हिंगे यांना गाडी आडवी घालत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

हिंगे यांना गाडीवरून खाली ओढत हातातील लाकडी दांडक्याने दोघा चोरट्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. या झटापटीत हिंगे यांच्या हातातील सोन्याची अंगठी, मोबाईल व रोख रक्कमेसह 68 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी हिंगे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूध्दात फिर्याद दिली आहे. पोलीस नाईक शिंदे हे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*