Friday, May 3, 2024
Homeजळगावगुरांची अवैध तस्करी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा

गुरांची अवैध तस्करी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार । प्रतिनिधी NANDURBAR

शहरातील सहारा टाऊनजवळ अवैध गुरांची तस्करी करणारी पिकअप व्हॅन पोलीसांनी पकडली असून 6 लाख 9 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सहारा टाऊनजवळ पिकअप वाहन (क्र.एम.एच.39-ए.डी.0257) यात बेकायदेशीरित्या पाच बैल कोंबून वाहतुक करतांना आढळल्याने त्यांच्याकडून पाच लाखाचे वाहन व 1 लाख 9 हजार रूपये किंमतीचे पाच बैल असा एकूण 6 लाख 9 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी पकडला आहे.

पोना सादरक पठाण यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात बुधा भुला ठाकरे (रा.दोंडाईचा), शेख शरीफ शेख तुकडू रा.ईलाहीचौक (नंदुरबार), पप्पु कुरेशी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई महाले करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या