परित्यक्ता महिलेवर अत्याचार; एकाला अटक

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – परित्यक्ता महिलेला बळजबरीने चारचाकी वाहनातून बसवून उसाच्या शेतात घऊन जाऊन अत्याचार केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून तालुक्यातील लिंपणगाव येथील तुकाराम गुलाब गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील संबंधित 25 वर्षीय महिलेच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती आपल्या आईकडे दोन मुलासह रहात आहे. दि. 6 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लिंपणगाव ते कारखाना या रस्त्याने ती पायी जात असताना पाठीमागून आलेल्या पिकअप वाहनचालक तुकाराम गायकवाड याने वाहनात बसा तुम्हाला घरी सोडतो असे म्हणाला.
त्यास महिलेने नकार दिला असता तुकाराम गायकवाड याने जबरदस्तीने त्या महिलेला वाहनात बसवून उसाच्या शेतात घेऊन जाऊन अत्याचार केला.
महिलेने आपली सुटका करून घेत शेजारी असलेल्या वीटभट्टीवर आश्रय घेतला. तेथील लोकांनी तिच्या घरच्यांना फोन करून बोलावून घेत उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले.
उपचार घेतल्यानंतर महिलेने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन आरोपी तुकाराम गुलाब गायकवाड (रा. लिंपणगाव) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश कांबळे हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*