अपहरण करून तरुणीवर अत्याचार

0

नगरमध्ये डांबले होते; तिघे आरोपी श्रीगोंद्याचे

अहमदनगर (प्रतिनिधी) – केडगाव येथून एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार झाल्याची घटना शनिवारी (दि. 15) घडली. अत्याचार करणारे तरुण श्रीगोंदा तालुक्यातील असल्याचे नंतर समोर आले. कोतवाली पोलीस ठाण्यात या तिघांविरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल गिरिराज भोसले (रा. श्रीगोंदा), टिपूस नेहरू भोसले व मनोज नेहरू भोसले (रा. लोणी व्यंकनाथ) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी शनिवारी श्रीगोंदा येथील एका तरुणीचे अपहरण केले होते. एका चारचाकी वाहनात त्यांनी तरुणीस नगर रेल्वे स्थानक परिसरात आणले. त्या तरुणीस एका खोलीत डांबून टिपूस याने तिच्यावर दोनदा अत्याचार केला.

पीडित तरुणीने आरडाओरड केली असता तिला दगडाने मारहाण करण्यात आली. घडला प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारुन टाकेन अशी धमकी देण्यात आली. पीडित मुलीस पुन्हा घरी सोडल्यानंतर धमकीमुळे तिने घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही.

मात्र तिला मानसिक त्रास झाल्यामुळे पालकांना तिने ही घटना पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिने दिलेल्या जबाबानुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*