अखेर पीडित तरुणीला फिर्यादीची प्रत मिळाली

0

10 दिवसांनंतर न्यायदंडाधिकार्‍यांच्या समोर जबाब

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरीच्या तरुणीवर मंत्र्याच्या बॉडीगार्डने अत्याचार करत गर्भपात केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 11 दिवसानंतरही पीडितेला फिर्यादीची प्रत मिळाली नव्हती. या विरोधात माध्यमांनी आवाज उठवताच शनिवारी (दि.15) त्या तरुणीस फिर्यादीची प्रत देण्यात आली आहे. तसेच 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्यायदंडाधिकार्‍यांच्या समोर 164 प्रमाणे जबाबा नोंदविण्यात आले.
त्यामुळे जिल्ह्यातील स्मार्ट पोलिसिंगच्या नावावर प्रश्‍नचिन्ह आहे.
हक्काच्या फिर्यादीसाठी दहा दिवस पोलीस ठाणे ते विभागीय कार्यालयाचे उंबरे झिजविल्यानंतर अखेर त्या तरुणीस फिर्यादीची प्रत मिळाली आहे. गुन्ह्यातील आरोपी हा मंत्र्याचा बॉडीगार्ड असल्याने त्याला पोलिसांकडून अभय मिळत आहे.
11 दिवसांनंतरही त्याला अटक करण्यास पोलीसांचे धाडस होत नाही. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पोलीस आरोपीस कालावधी उपलब्ध करून देत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अत्याचार, गर्भपात, अ‍ॅट्रॉसिटी या गंभीर गुन्ह्यात आरोपीचे अन्य नातेवाईक असून त्यांची चौकशी झालेली नाही. या प्रकरणाचा तपास आयसीएस अधिकार्‍याकडे असून देखील आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत.
गुन्हा घडल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यासाठी तसेच काही घटनास्थळी भेटी देण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांनीच पुढाकार घेतला. यात एकही अधिकार्‍यांने समर्थता दर्शविली. त्यामुळे हा तपास पोलीस कॉन्स्टेबलकडे देण्यात आला आहे का? असा प्रश्‍न तरुणीने माध्यमांसमोर उपस्थित केला आहे.
पीडित तरुणीस फिर्यादीची प्रत देणे, 10 दिवसानंतर न्यायदंडाधिकार्‍यांच्या समोर जबाब नोंदविणे, 11 दिवसानंतरही आरोपी फरार असणे, डॉक्टर, वकील, पोलीस यांना गुन्ह्यातून वगळणे, आरोपीला माहिती पुरविणे या प्रकारामुळे पोलीस खात्याकडून आरोपीचा शोध लागणे अशक्य असून पीडितेला न्याय मिळण्याची चिन्हा धुसर आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास होण्यासाठी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी रिपाइंच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

  पीडित तरुणीचा गर्भपात ज्या डॉक्टरांनी केला, त्याठिकाणी आरोपीने आम्ही पतीपत्नी असल्याचे सांगितले होते. आधारकार्ड, विवाह प्रमाणपत्र, आणि सरकारी नियमांचे पालन न डॉक्टरांनी सहजासहजी गर्भपात कसा केला?  तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की, एका वकीलाने बळजबरीने माझ्या सह्या घेतल्या आहेत. आरोपींच्या घरच्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. शहर वाहतूक शाखेच्या एका पोलीस कर्मचार्‍याला हा सर्व प्रकार माहित असून त्याने, ही माहिती लपून ठेवली. तसेच पीडितेला अर्थपूर्ण तडजोडीतून तोडगा काढण्यास प्रवृत्त केले. यामुळे मुख्य आरोपी देखील निर्दोष सुटेल की काय? असा सवाल पीडितेने केला आहे.

LEAVE A REPLY

*