मटका बुकींना लुटले : चन्या बेगच्या टोळीची कबुली

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)– श्रीरामपुरातील कुविख्यात गुंड चन्या बेग व त्याच्या साथीदारांनी कर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून आळे फाट्यावरील एक़ा मटका बुकीकडून लाखो रुपयांचा ऐवज घेऊन लूट केली असल्याची कबुली काल शाहरुख शेख व इतर साथीदारांनी दिली. त्यामुळे आता बेग, शाहरुख शेख व त्यांचे साथीदार पुन्हा दुसर्‍या गुन्ह्यात वर्ग केले जाण्याची शक्यता आहे.
कुविख्यात गुन्हेगार चन्या बेग, अर्जुन दाभाडे,शाहरुक शेख, टिप्या बेग, तन्वीर शेख यांनी आळे फाटा येथील मटका बुकीकडे इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे दाखवून त्या बुकीकडून लाखो रुपयांच्या रोख रक्कमेसह काही ऐवजही लुटून नेला असल्याची कबुली या गुन्हेगारांनी गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गेल्या दीड महिन्यापासून चन्या बेगसह त्याच्या साथीदारांना अटक केली होती तर शाहरुख शेख यालाही त्याच्या साथीदारांसह मागील महिन्यात अटक केली होती. ज्यांनी ज्यांनी या गुन्हेगारांना मदत केली त्यांनाही ताब्यात घेतले जात आहे. हे सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आले. त्यामुळे पोलीस कोठडी दरम्यान या गुन्हेगारांनी संबंधित कबुली दिली. त्यामुळे या आरोपींवरील संकट वाढले आहे.
आणखी किती लोकांना या गुन्हेगारांनी पकडले याबाबतची माहिती पोलीस घेत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातही या गुन्हेगारांनी चांगलीच दहशत माजवली होती. त्यामुळे यांच्याविरोधात कोणीच बोलायला तयार नव्हते. परंतु गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने पसार असलेल्या कुविख्यात गुन्हेगारांना शोधून त्यांच्याविरुध्द कारवाईची धडक मोहीम सुरू केली होती आणि अनेक गुन्हेगार त्यांच्या गळालाही लागले; परंतु त्यांच्याकडून अजून काय काय माहिती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*