घरात गणपती बसविला म्हणून ….त्या दाम्पत्यास जीवंत जाळण्याचा प्रयत्न

0
18 जणांवर गुन्हे दाखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहराच्या नजीक आलमगीर येथे घरात श्रीगणेशाची स्थापना केली म्हणून एका दाम्पत्यास रॉकेल व पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बुधवारी अत्यावस्थेत असणार्‍या गुडीया अजहर शेख यांच्या जबाबानुसार भिंगार पोलीस ठाण्यात 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात सादीक शेख, जुबेर सय्यद व आझम खान यांची नावे निष्पन्न झाली असून अन्य 15 जणांचा शोध सुरू आहे. दरम्यान हा कोणताही स्पोट नसून घातपात आहे. याचे वृत्तांकन दैनिक सार्वमतने केले होते. ते तंतोतंत खरे ठरले आहे.
मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जखमी अजहर शेख व त्यांची पत्नी घरात बसले होते. यावेळी अचानक 15 ते 20 जणांनी घरात प्रवेश केला. समाजाच्या विरोधात जाऊन घरात गणपती बसवतो काय असे म्हणून त्यांनी अजहर शेखला शिवीगाळ दमदाटी केली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर अशा प्रकाचे कृत्य केल्याचा राग असल्याचे आरोपींना बोलून दाखविले. अजहर शेख घरात घुसलेल्या तरुणांना समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्यांनी काही एक न एकता त्यास मारहाण करण्यास सुरूवात केली.
घरात रॉकेल व पेट्रोलचे ड्रम आणून त्यांनी सर्वत्र ओतले. शेख यांच्यासह पत्नीवर देखील हे ज्वलनशील पदार्थ ओतून घराला आग लावून दिली. व आरोपी घटनास्थळाहुन पसार झाले. काही काळानंतर घरातून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले.
घरात गॅस टाकीचा स्पोट झाल्याची अफवा वार्‍यासारखी पसरली. त्यामुळे अग्नीशामक दलाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग विझवून त्यांनी शेख दाम्पत्यास बाहेर काढले. मात्र घरातील गॅसटाकी सुरक्षीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शंकेचे पेव फुटले होते.
या घटनेची बॉम्ब शोधक पथकाने योग्य चौकशी केली. या घटनेचा सखोल तपास करून घरातील आग कशामुळे लागली याची उकल केली. अजहर शेख व त्यांची पत्नी उपचार घेत असल्यामुळे घटनेचे मुळ कारण समजणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाहुन काही नमुने गोळा केले होेते.
त्यानुसार हा अपघात नाही तर घातपात आहे. यावर प्रशासन ठाम झाले होते. कारण घरातील गॅस टाकी शाबुत होती. मात्र घरात काही रॉकेल व पेट्रोलचे ड्रम मिळून आले होते. बुधवारी या घटनेतील सर्व प्रकारावर पडदा पडला. गुडीया शेख यांचे पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने साक्ष घेतली.
त्यात त्यांनी तीन आरोंपींसह अन्य व्यक्तींनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हणले आहे. याप्रकरणी भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.

तपास सीआयडीकडे द्या – ही घटना घडल्यानंतर अजहर शेख यांच्या समर्थकांनी पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेतली. घडलेली घटना गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे दोषींना अटक झाली पाहिजे. या गुन्ह्याचा सखोल तपास व्हावा यासाठी हा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर शर्मा यांनी विशेष तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत.

राजकारण अंगाशी आले  – नगरसेवक होण्यासाठी सर्वसमावेशक मतांची गरज असता. त्यामुळे समाज्याच्या विरोधात जाऊन अजहर यांनी घरात श्रीगणेशाची स्थापना केली होती. याबाबत त्यांनी फेसबुकवर आव्हानात्कम पोष्ट देखील केली होती. त्यामुळे या दाम्पत्यास राजकारण अंगाशी आल्याचे बोलेले जात आहे.

LEAVE A REPLY

*