मंत्र्याच्या ‘त्या’ बॉडीगार्डवर अखेर गुन्हा दाखल

0

राहुरी तालुक्यातील तरुणीवरील अत्याचार प्रकरण

अहमदनगर (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातून शिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर एका मंत्र्याच्या बॉडीगार्डने अत्याचार करून गर्भपात केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामदास अकोलकर (वय 21, रा. तपोवनरोड सावेडी) असे बॉडीगार्डचे नाव आहे.

दि. 26 डिसेंबर 2016 रोजी पीडित मुलगी शहरात राज्य सेवा परीक्षेच्या तयारीसाठी आली होती. यावेळी आरोपीने तिला रूम पाहून देतो असे सांगून तिच्यासोबत मैत्री केली. दरम्यान दोघे एकमेकांच्या संपर्कात आले असता त्याचे रुपांतर प्रेमात झाले. गणेशने पीडित तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

काही दिवसानंतर ही तरुणी गरोदर राहिल्याचे लक्षात आले. त्यावेळी तरुणीने गणेशकडे विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. या दरम्यान आरोपीने पीडित मुलीस उडवाउडवीची उत्तरे देऊन एका डॉक्टराच्या माध्यामातून तरुणीचा गभर्पात केला. आरोपीने विवाह करण्यास टाळाटाळ केली असता आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. हा प्रकार पोलिसांना सांगण्यासाठी तरुणी पोलीस ठाण्यात गेली असता गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली.

आरोपी हा एका मंत्र्याचा बॉडीगार्ड आहे, तसेच त्यांचे नातेवाईक पोलीस खात्यात असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास मोठा दबाव टाकला जात होता. मात्र पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे पीडित मुलीने धाव घेतली असता शर्मा यांच्या आदेशाने बुधवारी (दि.5) रोजी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार, गर्भपात, शिवीगाळ, दमदाटी व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे करीत आहेत.

राजकीय दबावानंतरही…... ही घटना दडपण्यासाठी मोठा राजकीय हस्तक्षेप करण्यात आला होता. एका बड्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून पीडित मुलीशी अर्थपूर्ण तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. दैनिक सार्वमतच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडण्यात आली. तसेच पीडित मुलगी ठाम राहिल्यामुळे तिला न्याय मिळाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक होणार का याबाबत मात्र अनेकांना प्रश्न पडला आहे.

LEAVE A REPLY

*