सोशल मीडियावर बदनामी : पारनेरच्या शिक्षकावर गुन्हा दाखल

0
राहुरी (प्रतिनिधी) – सोशल मीडियावर धनगर समाजातील स्त्रियांची बदनामी केल्याबद्दल यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजयराव तमनर यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून एका शिक्षकाविरूद्ध पारनेर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. 500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव तमनर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले, दि. 18 ऑगस्ट 2017 रोजी ‘आक्रोश कामधेनूचा’ या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर एका माथेफिरूने मेंढपाळ धनगर समाजातील स्त्रियांच्याबाबत जाणीवपूर्वक बदनामीकारक पोस्ट टाकून व्हायरल केली.
बापू औटी या शिक्षकाने मेंढपाळ महिला भगिनीची अवहेलना करण्याच्या हेतूने ही पोस्ट टाकली. या शिक्षकाने 100 रुपयाच्या स्टॅम्पपेपरवर माफीनामाही लिहून दिला. परंतु त्यास धनगर समाज व यशवंत सेना कधीही माफ करणार नाही.
या शिक्षकाला योग्य ती शिक्षा करून शासकीय सेवेतून निलंबीत करावे. या सर्व बाबींचा पाठपुरावा यशवंत सेना करणार आहे. या शिक्षकाविरूद्ध पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात या शिक्षकाविरूद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, असे यशवंत सेनेच्यावतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते गंगाधर तमनर, पारनेर यशवंत सेनेचे तालुकाप्रमुख जानकू वाव्हळ, वावरथचे उपसरपंच ज्ञानेश्‍वर बाचकर, रामचंद्र घुटूकडे, युवा यशवंत सेनेचे अभिमन्यू बाचकर, अनिल डोलनर आदी समाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*