नगर शहरात कत्तलखान्यावर छापा : नगरसेवकासह चौघांवर गुन्हे दाखल

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील झेंडीगेट परिसरातील कत्तलखान्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टकला. यात सुमारे 22 जनावरांसह एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी एका नगरसेवकासह चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झेंडीगेट येथील शाळा नं 4 च्या पाठीमागे असणार्‍या एका जागेवर कत्तल करण्यासाठी सुमारे 22 जनावरांना आणण्यात आले होते. यासंबंधीची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने झेंडीगेट परिसरातील संबंधित ठिकाणी छापा टाकून 22 जनावरांसह एक लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

जागा मालक (नाव माहीत नाही), व उमर फिरोज कुरेशी, फैसल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी यांनी कत्तल करण्यासाठी या जनावरांना येथे आणले होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे जनावरांची सुटका झाली. या प्रकरणी जागा मालक, उमर फिरोज कुरेशी (वय-21, कुर्ला, मुंबई, ह. रा. झेंडीगेट), फैसल शौकत कुरेशी (वय 23, मुंबई, ह. रा. झेंडीगेट), मुस्तफा शरीफ कुरेशी (वय 22, कुर्ला मुंबई) यांच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पथकात पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड, पोलीस कर्मचारी अभिजीत आरकल, सचिन जाधव, दत्तात्रय शिंदे, श्री. गिरवले यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

*