शाळकरी मुलास आत्महत्येसाठी प्रवृत्त केले : वांजुळपोईच्या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल

0

शिवाजी विटनोरला अटक

राहुरी (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील वांजूळपोई येथे 15 वर्षीय शाळकरी मुलास आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात बाळासाहेब जानकू थोरात (वांजुळपोई, वय 35, ता. राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोन्याबापू भाऊराव विटनोर, शिवाजी सोन्याबापू विटनोर (वांजुळपोई, ता. राहुरी) या दोघा बाप-लेकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील शिवाजी विटनोर यास पोलिसांनी अटक केली आहे.
जयदीप बाळासाहेब थोरात हा शाळकरी मुलगा गुरूवारी (दि. 24) पाच वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घराकडे जात असताना मुळा नदीच्या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, याबाबत पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरण समोर आले आहे. जयदिप थोरात याने पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, घटनेबाबत मृत जयदिपच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना सांगितली.
जयदिप थोरात याने वांजूळपोई गावातीलच बिडगर वस्ती येथे दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान सोन्याबापू विटनोर यांचा मोबाईल चोरला होता. मोबाईल चोरल्याचा राग मनात धरून आरोपी सोन्याबापू भाऊराव विटनोर, शिवाजी सोन्याबापू विटनोर या दोघा बापलेकांनी जयदिप यास मारहाण करून त्यास आई-वडिलांकडे नेले होते.
दरम्यान, मृत जयदिप याने मोबाईल चोरी केल्याने झालेली मारहाण व आई-वडिलांना कळाल्यास होणारी फजिती लक्षात घेता रस्त्यातूनच दोघा बापलेकांना हिसका देऊन मुळा पात्राकडे धूम ठोकली. मयत जयदिप याने नदीपात्रात उडी घेऊन जीवन यात्रा संपविल्याचे सांगत त्यास आत्महत्येसाठी विटनोर बाप लेकांनी प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*