डॉ. तुपेरेंवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

0

 पथकाशी हुज्जत घातल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनियमित बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला शिवीगाळ झाल्याप्रकरणी पोलिसांत डॉ. प्रदीप तुपेरे यांच्यासह तिघांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पथकाच्या आरोपांमुळे त्यांच्या मागे कारवाईची व्याधी मागे लागली आहे.

कोर्टाच्या ऑर्डरनंतर महापालिकेने शहरातील हॉस्पिटलच्या नियमबाह्य बांधकामावर हातोडा उगारला आहे. आतापर्यंत 19 हॉस्पिटलची बांधकामे काढण्यात आली. सोमवारी प्रेमदान चौकात कारवाई सुरू असताना दोघांनी अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. मोटारसायकल अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर महापालिका कामगार युनियन एकटवून काम बंद आंदोलन सुरू केले. डॉक्टर तुपेरे यांच्या हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी करत युनियन आक्रमक झाली. आयुक्त घनशाम मंगळे यांच्यासोबत युनियनची बैठक झाली. त्यात सहाय्यक आयुक्त विक्रम दराडे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. दराडे यांनी अजून गुन्हा दाखल केलेला नाही. सुरेश इथापे यांनी कालच तोफखाना पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. त्यात डॉ. तुपेरे यांच्यासह सिराज दंडा आणि आय्याज दौलतखान यांचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे व जीवे मारण्याची धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान इंडियम मेडिकल असोशिएशनने पत्रक प्रसिध्द करून कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. चुकीचे समर्थन करणार नाही असे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही डॉक्टर शांतताप्रिय असून कायदा मानणारे आहोत. संघटनेचे सदस्य असलेले डॉक्टर स्वत:हून पार्किंग खुली करत आहेत. आम्ही महापालिकेला सहकार्य करत असून आमची बाजू कोर्टात मांडत आहे. अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करून कोणी कायदा हातात घेत असेल तर त्यांच्या पाठीशी संघटना उभी राहणार नाही. कायदा सगळ्यांपेक्षा मोठा आहे. या प्रकरणात कोणी दोषी आढळला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. न्यायालयाचा आदर करून महापालिकेला सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे. – डॉ. रियाज शेख, अध्यक्ष, आयएमए संघटना

महापालिकेच्या कारवाईस विरोध न करता सहकार्य करण्याची भूमिका घेतली. कोणताही अडथळा निर्माण केला नाही. ज्याने कोणी शिवीगाळ केली त्याचा आणि माझा संबंध नाही. मी महापालिकेला सहकार्यच केले आहे.
ः डॉ. प्रदीप तुपेरे

 

LEAVE A REPLY

*