आश्‍वीतील अत्याचार प्रकरण : मुख्य आरोपीच्या आईस अटक

0

आज न्यायालयात हजर करणार

अहमदनगर, आश्‍वी (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील लोणी येथील एका आदिवासी मुलीचे खांबा येथून अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यास सहकार्य करुन पिडीत मुलीला मारहाण करणार्‍या आरोपीची आई कांताबाई शिंदे हिला याप्रकरणी सहआरोपी म्हणून सायंकाळी अटक करण्यात आली आहे. आज तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
लोणी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन संगमनेर तालुक्यातील खांबा येथील तरुणाने अत्याचार करण्यास सहकार्य करुन पिडीत मुलीला मारहाण करणार्‍या आईला आश्वी पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी दहावीची परीक्षा दिल्यानंतर सुट्टीसाठी मामाच्या घरी गेली असता मंगळवारी 25 मे रोजी रात्री आजोबा सोबत घराबाहेर झोपली असताना खांबा येथील अमोल संपत शिंदे याने अपहरण करुन तिला साकूर, कोल्हापूर व पुणे येथे नेऊन सुमारे बारा दिवस तिच्यावर अत्याचार केले तर कांताबाई शिंदे हिने वेळोवेळी मारहाण करत चटके दिले यामुळे पिडीत मुलगी प्रचंड तणावाखाली आली असता आरोपीने पीडीत मुलीला खांबा परिसरात सोडून देत पळ काढला होता.
या घटनेची तक्रार व पिडीत मुलीचा जबाबावरून आश्वी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या जबाबावरून आरोपीचा व त्यांच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र मिळून येत नव्हते. आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना खबर्‍याव्दारे कांताबाई शिंदे या खांबा परिसरात असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग कावरे पोलीस नाईक अनिल शेगाळ, कैलास ठोंबरे, रामचंद्र साळुंके, महिला पोलिस नाईक शशिकला हांडे यांनी सापळा लावून ताब्यात घेतले.

आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ
जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील एका महिला आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. एक पथक आरोपींच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेण्यास यश येईल. आरोपी पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे. कोणी दबाव आणून तपासावर परिणाम होईल किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असे कृत्य करु नये. पिडीत मुलीस न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे.
– अशोक थोरात (पोलीस उपअधिक्षक)

मामाच्या घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेतील आरोपी पसार असून आरोपीच्या आईला सहआरोपी असून तिला आश्वी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे तर आरोपीच्या तपासासाठी पथक रवाना झाले आहे. या प्रकाराची उकल लवकरच होईल असेही त्यांनी सांगितले.
राजेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक, आश्वी

LEAVE A REPLY

*