मृतदेहाची विल्हेवाट पोलीस कर्मचार्‍याच्या अंगलट

0

मुख्य सुत्रधारांचा शोध सुरू : कर्जतमध्येच पुन्हा मृतदेह

कर्जत (प्रतिनिधी) – जत तालुक्यातील युवकाचा खुन करून मृतदेह नगर-सोलापुर रस्त्यावरील बाभूळगांव (ता. कर्जत) शिवारामध्ये आणून टाकला. प्रकरण दडपविण्याच्या उद्देशाने पुरावा नष्ट करण्यासाठी मंगळवेढा (जि.सांगली) पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दत्ता गोरख भोसले याने केलेले कारस्थान त्याच्याच अंगलट आले अन् नगर जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक घनश्याम पाटील, कर्जतचे उपविभागीय पोलीस निरीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनी सापळा रचून त्या पोलीस कर्मचार्‍याला अलगद अटक केली.

सविस्तर माहिती अशी की, आषाढी एकादशी वारीसाठी पंढरपूरला गेलेल्या नितीन अर्जुन यादव (वय 33, रा. वायफळ, ता.जत,जि. सांगली) हा 5 जुलै रोजी अचानक घिरडी ता.सांगली येथे आला. याचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट पोलिसाने लावली. पोलिसांनी अनोळखी मृतदेह नोंद केली दरम्यान मयत यादव यांच्या नातेवाईकांनी हे समजल्यावर त्यांनी कर्जत येथे येवून मृतदेह घेवून गेले होते.

दरम्यान नितीन अर्जून यादव याचा खून कोणी व का? केला. याचा शोध घेण्याचे आव्हाण होते. मयत यादव याचा मोबाईल फोन देखील खून करणार्‍याने गायब केला होता. पोलीस कॉन्स्टेबल असलेला भोसले याचाही या प्रकरणात हात असावा असा संशय बळावला व त्यावर लक्ष ठेवले. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून त्याच्या घरात छापा टाकला असता मृत नितीनचा मोबाईल सापडला. चौकशीअंती आरोपी यादवने खुनाची कबुली दिली. या गुन्हाच्या शोधामध्ये पोलीस निरीक्षक सायबर सेलचे सुनिल पवार व पथकातील पोलीस कॉन्स्टेबल श्री.भापकर, श्री.करूंद, श्री.कासर व श्री.घोडके यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*