नेवाशात 1400 किलो गोमांस जप्त

0

श्रीरामपूरच्या एकावर गुन्हा

नेवासा (का. प्रतिनिधी)- औरंगाबादकडे गोमांस घेऊन जाणारी बोलेरो पिकअप नेवासा पोलिसांनी काल प्रवरासंगम येथे पकडली. त्यात 1400 किलो गोमांस आढळून आले असून याप्रकरणी श्रीरामपूर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा पोलिसांनी बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या सिमेवर प्रवरासंगम येथे तपासणी नाका उभारला आहे. दुपारी पावणेदोनच्या सुमारास नगर-औरंगाबाद रोडवर एमएच 27 एक्स- 1310 या क्रमांकाची पांढर्‍या रंगाची बोलेरो पिकअप जाताना दिसली. नेवासा पोलिसांनी ती थांबवून तपासली असता त्यात जनावरांच्या मांसाचे मोठे तुकडे व हाडे मिळून आले.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल वसीम मुस्तफा इनामदार (प्रवरासंगम दूरक्षेत्र) यांनी फिर्याद दिली. त्यावरुन निसार इकबाल कुरेशी रा. वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले की, 120 रुपये किलो प्रमाणे 1400 किलो गोमांस व जुनी वापरती पांढर्‍या रंगाची बोलेरो पिकअप जीप असा 5 लाख 68 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक पी. आर. भिंगारे, हेडकॉन्स्टेबल शैलेंद्र ससाणे, पोलीस नाईक प्रितम मोढवे, पोलीक कॉन्स्टेबल राहुल यादव, कॉन्स्टेबल रघुनाथ कारखेले, कॉन्स्टेबल शाम बनकर, कॉन्स्टेबल वसीम इनामदार यांनी ही कारवाई केली.
फिर्यादीवरुन आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 429, प्राणी संरक्षण अधिनियम सुधारीत कायदा 2015 कलम 5(क) (ड), 9 (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी. आर. भिंगारे करत आहेत.

LEAVE A REPLY

*