नोटा बदली प्रकरणी हंगेवाडीच्या कांगणेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा

0

संगमनेर (प्रतिनिधी) – नागपूर येथे चलनातून बाद झालेल्या कोट्यवधींच्या नोटा बदली प्रकरणात नागपूर गुन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या कारवाईत मोठे रॅकेट उघड झाले आहे. याप्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सोमवार 14 ऑगस्ट पर्यंत त्यांना पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

या रॅकेटमध्ये संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील अमित अंकुश कांगणे (वय 32) व नितीन नागरे (वय 37, रा. शेडगाव) व सचिन शिंदे (संगमनेर) यांचा समावेश आहे.
गेल्या 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक पोलिस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी नागपुर येथील वॉक्स कुलर चौकातील राणा इमारतीत सुरू असलेल्या नोटाबदली डीलिंगवर छापा टाकला होता. यात प्रसन्ना पारधी यास अटक करण्यात आली.

तर त्याच्याकडून एक कोटींच्या चलनातून बाद नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 139/17 भारतीय दंड संहिता 420, 353, 342, 343, 188, प्रोपा फाईल बँक नोट अ‍ॅक्ट 517/2017 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात प्रसन्नाकडून गुन्हे शाखेला मोठी लिंक मिळाली. पहिल्या टप्प्यात मुंबई व संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील माहिती पोलिसांना मिळाली.

सदर गुन्ह्यात इतर साथीदारांचा शोध घेत असतांना पोलिसांनी मुंबई येथून हंगेवाडीच्या अमित अंकुश कांगणे (वय 32) व शेडगांव येथील नितीन नागरे (वय 37,) नागेश कुसकर (वय 30, रा. डोबिवली), आणि सचिन शिंदे (संगमनेर) यांना कामठी रोडवरील दुवा कंटिनेंटल हॉटेलधील रुम क्रमांक 301 मध्ये चलनातून बाद झालेल्या नोटांची डिल करतांना ताब्यात घेतले.

त्यामुळे या प्रकरणात एकूण आरोपींची संख्या पाच झाली आहे. सदर आरोपींना पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सोमवार दि. 14 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीच्या शोधात नागपूर पोलीस आहेत.

कोण आहेत हे आरोपी? – 
हंगेवाडी येथील अमित अंकुश कांगणे हा मुंबई-कल्याणमधील सर्वांत मोठा व्यावसायिक आहे. तो मेड इन चायना इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचा व्यापारी आहे. यासोबतच त्याचे एक पब्लिकेशनही आहे. दुसरा आरोपी नितीन नागरे (शेडगाव) हा त्याचा कारचालक आहे. मात्र, त्याच्या नावाने तो कोट्यवधींचे व्यवहार करतो. नागेश कुसकर हा डोंबिवली येथील निबंधक कार्यालयात दलाल म्हणून कार्यरत आहे. चौथा आरोपी सचिन शिंदे हा शेतकरी आहे. त्याची संगमनेर येथे काही हेक्टर जमीन आहे. यांची एकमेकांशी कशी ओळख झाली, याचा तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

*