देहविक्रीस खोल्या भाड्याने देणार्‍या लॉज मालकासह पाच जणांना कारावास

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील महात्मा गांधी रोड येथील आर्य निवास लॉजवर देहविक्रीचा व्यापार केला जात होता. याप्रकरणी दोषी धरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एम. नाईक- देशमुख यांनी लॉज मालकासह पाच जणांना दोषी धरुन परिमल लालचंद खंडेलवाल (रा. कापडबाजार, नगर), रमेश भगवान गवळी (रा. गवळीवाडा, नगर) व लालचंद माधवलाल खंडेलवाल (रा. कापडबाजार) या तिघांना तीन वर्षे तर भास्कर काशिनाथ वाबळे (रा. पिंपळगाव वाघा) व भाऊसाहेब गेणु थोपटे (रा. टाकळी ढोेकेश्‍वर, ता. पारनेर) या दोघांना एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
दि. 18 फेब्रुवारी 2013 साली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. टी. पवार यांना कापडबाजारातील आर्य निवास लॉजवर देहविक्रीचा व्यावसाय होत असल्याची माहिती मिळाली होती. पवार यांनी लॉजवर छापा टाकून तीन महिलांना ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आरोपी हे आमच्याकडून बळजबरीने देहविक्री व्यवसाय करुन घेत आहेत.
त्यानंतर लॉजच्या मालक व मॅनेजरसह पाच जणांना अटक करण्यातज आली होती. हा लॉज आरोपी लालचंद खंडेलवाल याच्या मालकीचा असून त्याचा संपुर्ण कारभार परिमल खंडेलवाल हा सांभाळत होता.
तसेच रमेश गवळी लॉजचा मॅनेजर म्हणून काम पाहत होते. या दरम्यान लॉजवर देहविक्री व्यवसाय करण्यास प्रतिबंध असताना देखील आरोपींनी खोल्या भाड्याने देऊन तीन महिलांना वेश्या व्यवसाय करण्यात प्रवृत्त केले जात होते.
भास्कर वाबळे व भाऊसाहेब थोपट यांच्या मध्यस्तीने ग्राहकांची उलाढाल केली जात होती. अशी माहिती समोर आली होती. याप्रकरणी छापे टाकून कल्याण गाडे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ए. टी. पवार यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
गुरूवारी (दि.3) या खटल्याच्या सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या समोर झाली.
सरकार पक्षातर्फे एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत महिला, तपासी अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व सरकारी पक्षाचे वकील ऍड. अनिल वाघ यांचा युक्तीवाद ग्राह्यधरुन न्यायालयाने परिमल खंडेलवाल, रमेश गवळी व लालचंद खंडेलवाल या तिघांना तीन वर्षे सक्तमजुरी तर भास्कर वाबळे व भाऊसाहेब थोपटे एक वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

*