Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

एकेकाळी दोनशे रूपयासांठी खेळत होता क्रिकेट; लागली टीम इंडियात वर्णी

Share

मुंबई : कोणाचा नशीब कधी उजळून निघेल सांगता येत नाही. अशाच ताज उदाहरण म्हणजे विंडीज दौऱ्यासाठी निवड झालेला नवदीप सैनी. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात वर्णी लागली असून एका सामान्य कुटुंबातून टीम इंडियात निवड झालेल्या सैनींचा प्रवास थक्क करणारा आहे.

मूळचा हरियाणाचा असलेला नवदीप सैनी सुरवात लेदर बॉलपासून झाली आहे. २६ वय असणाऱ्या नवदीप सैनी १४० ते १५० किमी प्रति तास या वेगाने गोलंदाजी करतो. क्रिकेट सुरू केलं तेव्हा खाजगी कोचिंगसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्याने टेनिस बॉल टूर्नामेंटमध्ये पैसे घेऊन खेळण्यास सुरूवात केली. एक मॅच खेळण्यासाठी नवदीप सैनी याला २०० ते ४०० रुपये मिळत होते. अशा प्रकारे मॅच खेळून नवदीप सैनी क्रिकेट कोचिंगचा खर्च काढत होता.

भारतीय संघात निवड होण्यापूर्वी दिल्लीतील गोलंदाज सुमित नरवाल यांनी करनाल प्रीमियर लीगच्या दरम्यान नवदीप सैनीची गोलंदाजी बघितली होती. त्यावेळी त्यांनी प्रभावित होऊन दिल्ली रणजी टीम साठी नवदीपची निवड केली. यानंतर दिल्ली मध्ये या ठिकाणी गौतम गंभीर देखील नवदीप सैनींच्या बॉलिंगने प्रभावित झाले. यावेळी गौतम गंभीर यांनी दोन जोड बूट आणि दररोज सरावासाठी येण्यास सांगितले. आणि इथूनच नवदीप सैनीची खरी सुरवात झाली.

यानंतर नवदीप सैनी आपल्या गोलंदाजीमुळे ओळखला जाऊ लागला. आणि आज भारतीय संघात निवड झाली आहे, हे विशेष.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!