Type to search

क्रीडा

आयपीएल १२ : विजयी चौकार मारण्यासाठी कोहली ब्रिगेड उत्सुक

Share

बंगळूर : आयपीएल १२ मध्ये बुधवारी २४ एप्रिल २०१९ रोजी विराट कोहलीच्या बंगळूर संघासमोर आर अश्विनच्या पंजाब संघाचे आव्हान असणार आहे. ह्या सामना एम. चिन्नस्वामी मैदानावर रात्री ८ वाजता होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

बंगळूर संघ १० सामन्यांमध्ये ३ विजय आणि ७ पराभवांसह तळाला आहे. बंगळूरच्या खात्यात सध्या ६ गुण जमा आहेत. बाद फेरी गाठण्यासाठी त्यांना आपले उर्वरीत ४ सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. तर दुसरीकडे पंजाब संघ १० सामन्यांमध्ये ५ विजय आणि ५ पराभवांसह १० गुणांनी पाचव्या स्थानावर आहे.

पंजाबला बाद फेरी निश्चित करण्यासाठी ४ पैकी ३ सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. चेन्नई कोलकाता यांना पराभूत केल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला बंगळूर संघ आपली विजयी मोहीम अशीच कायम राखण्यासाठी सज्ज आहे.

हे मैदान बंगळूर संघाचे घरचे मैदान आहे. हे मैदान आकाराने लहान असल्यामुळे येथे चौफेर चौकार षटकारांची आतषबाजी क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळेल यात शंका नाही. या मैदानावर एकूण ४० हजार प्रेक्षक बसू शकतात. रणजी संघ कर्नाटकचे घरचे मैदान आहे.

या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६० असून, २०१७ मध्ये बंगळूर आणि मुंबई या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात बंगळूरच्या स्यमूल बद्रीने हॅट्रिक याच मैदानावर घेतली होती.

बंगळूर संघाचे माजी खेळाडू लोकेश राहुल आणि क्रिस गेल आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे विराट ब्रिगेड गेलला लवकरात लवकर बाद करण्यासाठी काय रणनीती आखते? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या मैदानावर धावांचा पाठलाग करणारा संघ सर्वाधिक वेळा विजयी ठरला असल्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्रक्षणाला प्राधान्य देईल यात शंका नाही.

या खेळाडूंवर असेल विशेष नजर : गेल, राहुल, विराट, एबीडी.

आमनेसामने : २३ ११ विजय बंगळूरचे १२ विजय पंजाबचे अनिर्णित ०, बंगळूरची सर्वाधिक धावसंख्या २३५ विरुद्ध मुंबई, २०१५ पंजाब २३२ विरुद्ध मुंबई २०१७, नीचांकी धावसंख्या बंगळूर ४९ विरुद्ध कोलकाता, पंजाब नीचांकी धावसंख्या ८८

हवामान : स्वच्छ हवामान ४५% उष्णता राहण्याचा अंदाज

किंग्ज इलेवहन पंजाब : क्रिस गेल, लोकेश राहुल, मयंक अगरवाल, करुण नायर, सरफराज खान, डेविड मिलर, आर अश्विन, सॅम करण, मुजीब रहेमान, मुरुगन अश्विन, मंदीपसिंग, अँड्रू टाय, दर्शन नळकांडे, हरप्ररित बार, अंकित राजपूत, हार्डीस विजोन, आर्षदिपसिंग, मोझेस हेन्ड्रिक्स, मोहंमद शमी, निकोलस पुरण, प्रभाशीरमान सिंग, अग्निवेश आयची, आणि वरूण चक्रवर्ती.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : विराट कोहली, पार्थिव पटेल, एबीडी, मोईन अली, हेन्री क्लासेन, मार्कस स्ट्रोइनीस, नेथन कुलतेर्नेल, कोलीनदी ग्रॅन्डहोम, सिमॉन हेटमायर, देवदूत पल्लिकल, हिम्मतसिंग, प्रयास बर्मन, अक्षदीप नाथ, गुरकिरत, शिवम दुबे, पवन नेगी, मोहंमद सिराज, उमेश यादव, युझवेन्द्र चहल, टीम साऊथी, नवदीप सेनी, कुलवंत खेजरोलिया.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!