भारताचा चार धावांनी पराभव; टी २० मालिकाही गमावली

0

हॅमिल्टन : भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमधील टी २० मालिका न्यूझीलंडने जिंकली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघानी १-१ विजय संपादन केला असताना आज झालेल्या तिसऱ्या व निर्णयाक लढतीत न्यूझीलंड भारताला हरवत मालिका खिशात घातली आहे.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभारण्याच्या दृष्टीने मैदानावर मैदानावर उतरलेल्या न्यूझीलंडने संघाने २० षटकात २१२ धावांचा डोंगर उभा केला. कॉलीन मुन्रो (७२) आणि टीम सेइफर्ट (४३) यांनी सलामीलाच केलेल्या फटकेबाजीने न्यूझीलंडच्या धावांमध्ये भर घातली. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर किवीच्या अन्य फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला आणि भारतासमोर विजयासाठी २१३ धावांचे लक्ष्य ठेवले. केन विलियम्सनने २७ धावा केल्या, तर कॉलीन ग्रँडहोमने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना भारताची डोकेदुखी वाढवली. त्याने १६ चेंडूंत ३० धावा केल्या.

टी -२० मालिकेतील मालिका २-१ अशी जिंकत तिसऱ्या सामन्यात भारताला ४ धावांनी पराभूत केले. २१३ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने पूर्ण २० शतके खेळली. २१३ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरवात निराशाजनक झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ६ बाद २०८ धावा करता आल्या.

LEAVE A REPLY

*