मालिका गमावली असली तरी ‘विराट’ वर्चस्व कायम

0

मुंबई : भारताने जरी मालिका गमावली असली तरी कर्णधार विराट कोहली आयसीसी टेस्ट रँकिंगच्या फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. कोहलीने चौथ्या कसोटीत ४६ आणि ५८ धावा केल्या. इंग्लंड विरुद्धच्या आठ इनिंगमध्ये कोहलीने ५४४ धावा केल्या आहेत. त्याच्या खात्यात आता ९३७ गुण जमा झाले आहेत.

चौथ्या कसोटी सामन्यात भारताला लाजिरवाणा पराभव सहन करावा लागला. २४५ धावांचा पाठलाग करताना भारताला सलामीलाच ३ धक्के लागले. पण कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतक करून भारताला सावरण्याचा प्रयत्न केला.

कर्णधार असताना विराटनं टेस्टमध्ये ४ हजार रन पूर्ण केले आहेत. विराटआधी कोणत्याही भारतीय कर्णधाराला हे रेकॉर्ड मोडता आला नाही. विराट टेस्टमध्ये सर्वात जलद ४ हजार रन करणारा खेळाडू बनला आहे. विराटनं ६५ इनिंगमध्ये ४ हजार रन पूर्ण केल्या. याआधी ब्रायन लाराच्या नावावर हा रेकॉर्ड होता. लारानं ७१ इनिंगमध्ये ४ हजार रन केले होते. इंग्लंडमध्ये ५०० रन पूर्ण करणारा विराट पहिला आशियाई कर्णधार आहे. इंग्लंडमध्ये ५०० रन करणारा विराट तिसरा भारतीय खेळाडू आहे.

LEAVE A REPLY

*