२०१९ चे आयपीएल सामने भारताबाहेर होण्याची शक्यता

0

मुंबई : पुढच्या वर्षी भारताच्या बाहेर क्रिकेटचा उत्सव मानल्या जाणाऱ्या आयपीएलचे सामने होण्याची शक्यता असून भारतात २०१९ मध्ये लोकसभा निवडणुका होणार असून बीसीसीआयचे लक्ष निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होतात याकडे लागून आहे. कारण त्यावरच २०१९च्या आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे.

२००९ आणि २०१४ मध्येही याआधी भारताबाहेर आयपीएलचे सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत २००९ मध्ये तर युएईत २०१४ मध्ये आयपीएलचे सामने झाले होते. त्यामुळे २०१९ चे देखील आयपीएल भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. याच २ देशांमध्ये किंवा २ वेगवेगळ्या देशांमध्ये हे सामने होऊ खेळवले जावू शकता.

इंग्लंडची ही चर्चा यामध्ये होत आहे. इंग्लंडमध्ये सामने ठेवल्यास ते अधिक खर्चीक होऊ शकतात. युएईमध्ये तीनच मैदाने असल्याने अधिक कल हा आफ्रिकेच्या बाजुने आहे. लवकरच यावर बीसीसीआयची बैठक होणार आहे.

LEAVE A REPLY

*