Type to search

क्रीडा

आयपीएल १२ : विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी पंजाब उत्सुक

Share

मोहाली : आर अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब संघाने आयपीएल १२ मध्ये सुरुवातीचे ४ सामने जिंकून विजयी सुरुवात केली होती. पण अचानक सलग चार सामन्यांमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवांमुळे पंजाब संघावर यंदाच्या हंगामातील आपले आव्हान साखळीतच संपण्याची अडचण निर्माण झाली आहे. पंजाब संघाला आज आपल्या घरच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या राजस्थान रॉयल्सचा सामना करायचा आहे.

पंजाब प्रमाणेच राजस्थान संघासाठी हा सामना करा किंवा मरा असा असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरतील यात शंका नाही. पंजाब संघाचे ८ सामन्यांमध्ये ४ विजय आणि ४ पराभवांसह ८ गुण आहेत. तर, राजस्थान संघाचे ७ सामन्यांमध्ये २ विजय आणि ५ पराभवांसह ४ गुण आहेत मुंबई विरुद्ध वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थाननने मुंबईवर मात केली होती त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता पंजाबविरुद्धही विजयी लय कायम राखण्याचा राहणे अँड कंपनीचा इरादा आहे.

पंजाबच्या फलंदाजीची मदार राहुल, गेल, अगरवाल, मिलर, सर्फराज खान यांच्यावर आहे. तर अष्टपैलूंमध्ये सॅम कुरण, आर अश्विन, मंदीप सिंग यांच्यावरआहे. गोलंदाजीत मोहंमद शमी, अँड्रू टाय, अश्विन, मुजीब हे पर्याय आहेत. पंजाब संघासाठी जमेची बाजू म्हणजे राहुल, गेल, सर्फराज, मयंक अगरवाल चांगली फलंदाजी करत आहेत पण त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.

राजस्थान संघाबद्द्दल सांगायचे झाले तर फलंदाजीत, जोस बटलर, संजू सॅमसन, अजिंक्य राहणे, राहुल त्रिपाठी आहेत अष्टपैलूंमध्ये के गौतम, श्रेयस गोपाल, जोफ्रा आर्चर, बेन स्ट्रोक्स आहेत. गोलंदाजीत धवल कुलकर्णी, आर्चर, श्रेयस गोपाल, स्ट्रोक्स हे पर्याय आहेत .

राजस्थान आणि पंजाब आतापर्यंत आमनेसामने १८ राजस्थान विजयी १० पंजाब विजयी ८ मोहाली हे मैदान रणजी संघ पंजाब आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघांचे घरचे मैदान आहे. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७५ या मैदानावरील सर्वात मोठा विजय भारत ६ विकेट्सने विरुद्ध श्रीलंका २००९ निसटता विजय ऑस्ट्रेलिया २१ धावांनी विरुद्ध पाकिस्तान २५ मार्च २०१६ या मैदानावरील सर्वाधिक धावा विराट कोहली १ सामना ८२ धावा २०१६ टी २० विश्वचषक विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मैदानावरील सर्वाधिक बळी एडम मिल्ने १ सामना ४ षटके २६ धावा २ बळी २०१६.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!