आयपीएल १२ : उद्या राजस्थानला शेवटची संधी

0

जयपूर : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स संघ शनिवारी २० एप्रिल २०१९ रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर रोहीत शर्माच्या मुंबई इंडिअन्सचा सामना करणार आहे. हा सामना सायंकाळी ४ वाजता होणार आहे. सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

राजस्थान संघाचे ८ सामन्यांमध्ये २ विजय आणि ६ पराभवांसह ४ गुण असून त्यांचे ६ सामने शिल्लक आहेत. बाद फेरी निश्चित करण्यासाठी राजस्थानला आपले उर्वरीत ६ सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे. तर मागील २ सामन्यांमध्ये बंगळूर आणि दिल्लीला पराभूत केल्यानंतर मुंबई आता स्पर्धेतील आपला सातवा विजय संपादन करण्यासाठी उत्सुक आहे.

तर राजस्थान पुन्हा एकदा मुंबईवर रॉयल विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. राजस्थान संघाच्या फलंदाजीची मदार रहाणे, बटलर, सॅमसन, स्मीथ यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये बेन स्ट्रोक्स, श्रेयस गोपाल, के गौतम, स्टुअर्ट बिनी आहेत. गोलंदाजीत धवल कुलकर्णी, जाफ्रा आर्चर, के गौतम, स्ट्रोक्स, श्रेयस गोपाल आहेत.

मुंबई संघाबद्दल सांगायचे झाले तर, रोहीत, डिकॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, युवराज आहेत. अष्टपैलूंमध्ये हार्दीक पंड्या, बेन कटिंग, कृणाल पंड्या हे पर्याय आहेत. गोलंदाजीत कृणाल पंड्या, हार्दीक पंड्या, लसिथ मलिंगा, जेसन बेरेंडॉफ, जसप्रीत बुमरा आहेत.

जयपूर मैदान रणजी संघ राजस्थान आणि आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स संघाचे हे घरचे मैदान आहे. या मैदानावर एकूण ३० हजार प्रेक्षक बसू शकतात. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६८ आहे. आमनेसामने २२ वेळा १० विजयी राजस्थान ११ विजयी मुंबई १ अनिर्णित या खेळाडूंवर असेल

विशेष लक्ष : बटलर, रोहीत, पोलार्ड, के गौतम.

मुंबई इंडियन्स : रोहीत शर्मा, क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, आदित्य तारे, युवराजसिंग, अनुकूल रॉय, अनमोलप्रीतसिंग, रसिख सलाम, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इविन लुईस, राहुल चाहर, बरिंदर सरण, पंकज जयस्वाल, लसिथ मलिंगा, जेसन बेरेंडॉफ, मिचेल मॅक्लेनघन, जसप्रीत बुमरा, ऍडम मिल्ने दुखापतीने बाहेर.

राजस्थान रॉयल्स : मनन वोहरा, अजिंक्य राहणे, संजू सॅमसन, जोस बटलर, स्टीव स्मीथ, बेन स्ट्रोक्स, के गौतम, जाफ्रा आर्चर, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, लिअम लिंगविस्टन, श्रेयस गोपाल, ईश सोधी, महिपाल लोणार, आयुर्मान बिर्ला, प्रशांत चोप्रा, एस्टोन टर्नर, सुधेसन मिडून, रियन पराग, शशांक सिंग, शुभम रांजणे, वरुण ऍरेंन, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी आणि ओशन थॉमस.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

LEAVE A REPLY

*