आयपीएल १२ मध्ये गुलाबी जर्सीत खेळणार राजस्थान रॉयल्स

0

जयपूर : आयपीएलच्या २००८ हंगामाचा विजेता राजस्थान रॉयल्स संघ आगामी १२व्या हंगामात गुलाबी जर्सीत उतरणार  आहे. २००८ ते २०१५ या सात वर्षांकरता राजस्थान रॉयल्स संघाची जर्सी गडद निळ्या रंगाची होती. त्यावर बजाज  आलियान्झ आणि अल्ट्रा टेच सिमेंट असा लोगो होता. मात्र २०१३ च्या आयपीएल हंगामात स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी  आढळून आल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. मात्र याच राजस्थान संघाने  गतवर्षी आयपीएलमध्ये नव्याने प्रवेश घेतला. मात्र या वर्षी त्यांची जसी फिक्या निळ्या रंगाची होती. त्यावर केंट औरो  क्युर  असा नवा लोगो जर्सीवर प्रिंट करण्यात आला होता.

राजस्थान रॉयल्स संघाचे सवाई मानसिंग जयपूर हे घरचे मैदान आहे. जयपूर हे शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. म्हणून यंदाच्या हंगामात राजस्थान संघ गुलाबी जर्सीत मैदानात उतरणार आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे जोधपूर हे बालुआ दगडासाठी प्रसिद्ध आहे. उदयपूर हे संगमरवराचे उत्पादन करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे राजस्थान संघाच्या चाहत्यांच्या आनंदात आणखीनच भर पडणार आहे.

तसेच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी लेगस्पिनर फिरकी गोलंदाज  राजस्थान संघाचा माजी कर्णधार शेन वॉर्न संघाचा ब्रँड अम्बॅसेडर असणार आहे. याला रविवारी १० फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता देण्यात आली. राजस्थान संघाने गत हंगामात  चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानावर पार पडलेल्या लढतीत गुलाबी जर्सीचा वापर केला होता.

-सलिल परांजपे, देशदूत नाशिक

LEAVE A REPLY

*