आयपीएल १२ : बंगळूरला ‘रॉयल’ विजयाची संधी

0

मुंबई : आयपीएल १२ मध्ये आज सोमवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहीत शर्मा हे दोन कर्णधार आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर आमनेसामने येणार आहेत. हा सामना आज रात्री ८ वाजता वानखेडे मैदानावर होणार आहे.

बंगळूर आणि मुंबई ह्या दोन संघांमध्ये बंगळूर येथे झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरवर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. यात मुंबईने बाजी मारत आपले विजयी अभियान सुरु केले होते. आज होणाऱ्या सामन्यात मुंबई स्पर्धेतील आपला पाचवा विजय संपादन करण्यासाठी उत्सुक असेल तर मोहाली येथे पंजाबविरुद्ध मिळालेल्या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला बंगळूर संघ सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न करेल.

बंगळूर आणि मुंबई हे दोन संघ आतापर्यंत २६ वेळा समोरासमोर आले असून यात मुंबईने १७ तर बंगळूरने ९ लढती जिंकल्या आहेत. वानखेडे मैदानावर हे दोन संघ ८ वेळा समोर आले असून यात मुंबईने ५ तर बंगळूरने ३ सामने जिंकले आहेत.

हे मैदान आकाराने लहान असल्यामुळे येथे धावांचा पाठलाग करणारा संघ बाजी मारतो हे निश्चित आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम क्षेत्रक्षणाला प्राधान्य देईल, यात काही शंका नाही. मुंबई संघाच्या फलंदाजीची मदार रोहीत, डिकॉक, सूर्यकुमार, ईशान किशन यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये हार्दीक पंड्या, किरॉन पोलार्ड चांगली फलंदाजी करत आहेत. गोलंदाजीत हार्दीक, बेरेंडॉफ, बुमरा, मार्कंडे, राहुल चाहर आहेत.

बंगळूर संघाबद्दल सांगायचे झाले तर, विराट, एबीडी, पार्थिव पटेल धावा करत आहेत. संघाला चिंता आहे, ती स्ट्रोइनीस, मोईन, ग्रँडहोम यांच्या खराब फॉर्मची गोलंदाजीची मदार उमेश यादव, सिराज, नवदीप सेनी, चहल यांच्यावर आहे. बंगळूर संघाचे ७ सामन्यात १ विजय आणि ६ पराभवांमुळे २ गुण आहेत. बाद फेरीसाठी त्यांना उर्वरीत ७ सामने, जिंकणे गरजेचे आहे.

हवामान : ५८% उष्णता राहण्याचा अंदाज

या खेळाडूंवर असेल नजर : विराट, एबीडी, रोहीत, पोलार्ड.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर: पार्थिव पटेल, विराट कोहली, एबीडी, सिमॉन हेटमायर, मोईन अली, शिवम दुबे, मार्कस स्ट्रोइनीस, डी ग्रँडहोम, अक्षदीप नाथ प्रयास बर्मन, हिम्मतसिंग, मिलिंद कुमार, डेल स्टेन, कुलवंत खेजरोलिया, उमेश यादव, मोहंमद सिराज, नवदीप सेनी, युझवेन्द्र चहल, वॉशींग्टन सुंदर, देवदूत पल्लिकल, हेन्री क्लासेन, गुरकीरत मान आणि टीम साऊथी.

मुंबई इंडियन्स : रोहीत शर्मा, क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, युवराजसिंग, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, बेन कटिंग, किरॉन पोलार्ड, अनमोलप्रीतसिंग, अनुकूल रॉय, रसिख शेख, बरिंदर सरण, मयंक मार्कंडे, जयंत यादव, राहुल चाहर, जेसन बेरेंडॉफ, अलझारी जोसेफ, मिचेल मॅक्लेनघन, जसप्रीत बुमरा, लसिथ मलिंगा, आदित्य तारे, सिदेश लाड, पंकज जयस्वाल, इविन लुईस.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

LEAVE A REPLY

*