आयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज

0

हैद्राबाद : आयपीएल १२ मध्ये उद्या बुधवारी १७ एप्रिल २०१९ रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आतंरराष्ट्रीय मैदानावर केन विलियम्सचा सनरायझर्स हैद्राबाद संघ धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा सामना करणार आहे. सध्या चेन्नई संघ ८ सामन्यांमध्ये ७ विजय आणि १ पराभवास १४ गुणांनी आघाडीवर आहे.

आता सनराईझर्स हैद्राबादला पराभूत करून प्ले ऑफ मधील आपले स्थान निश्चित करण्याचा चेन्नई संघाचा प्रयत्न आहे, तर हैदराबादचे ७ सामने झालेले असून ३ विजय आणि ४ पराभवांसह ६ गुणांनी ते सहाव्या स्थानी आहे.

चेन्नई संघाच्या फलंदाजीची मदार वॉटसन, रायडू, रैना, डू प्लेसिस, केदार, धोनी यांच्यावर आहे, तर अष्टपैलूंमध्ये केदार जाधव, डीजे ब्रावो, रविद्र जडेजा आहेत गोलंदाजीत दीपक चाहर, शार्दूल ठाकूर, मिचेल सॅन्टेनर, जडेजा, स्कॉट कुगेलीन आहेत.

हैद्राबाद संघांबद्द्दल बोलायचे झाले तर सलामीवीर जॉनी बेरिस्टो , डेविड वॉर्नर , संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत पण संघासाठी अडचण म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरत आहेत मनीष पांडे , केन विलियम्सन, दीपक हुडा यांच्याकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. अष्टपैलूंमध्ये युसूफ पठाण, शाकिब अल हसन, आहेत गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, रशीद खान, बिली स्टॅन्लेक आहेत सुपरकिंग्जच्या विजयी रथाला लगाम घालण्यात हैद्राबाद पाशवी होणार का ? यावर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

२०१८ मध्ये चेन्नई च्या अंबाती रायडूने शानदार फलंदाजी करताना झळकावलेल्या अर्धशतकामुळे चेन्नईला १७० चा टप्पा पार करून दिला होता अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने वाघ्य्या ४ धावांनी रोमहर्षक विजय नोंदवला होता यात हैद्राबादचा कर्णधार केन विलियम्सनने झळकावलेले अर्धशतक व्यर्थ ठरले होते.

या पराभवाचा वचपा काढण्याची संधी हैद्राबादला आहे. सनराईझर्स संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला आयपीएल मधील आपले बळींचे शतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या एका विकेटची आवशयकता आहे. आमने सामने १०८ विजय चेन्नईचे २ विजयी हैद्राबाद या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १४७.

हवामान : ३९% उष्णता राहण्याचा अंदाज

यांचावर असेल लक्ष : डेविड वॉर्नर, केन विलियम्सन, रशीद खान,रायडू.
सनराईझर्स हैद्राबाद : डेविड वॉर्नर, मार्टीन गुप्टिल, जॉनी बेरिस्टो, मनीष पांडे, युसुफ पठाण, शाकिब अल हसन, दीपक हुडा, विजय शंकर, रिकी भुई, अभिषेक शर्मा, मोहंमद नबी, रशीद खान, टी नटराजन, बेसिल थंपी, संदीप शर्मा, खलील अहमद, बिली स्टॅन्लेक, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान सहा, श्रीवास गोस्वामी, शाबाझ नदीम.

चेन्नई सुपरकिंग्ज : फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, अंबाती रायडू, मुरली विजय, सुरेश रैना, केदार जाधव, एमएस धोनी, एन जगदीशन, ऋतुराज गायकवाड, के एम असिफ, मोनू कुमार, रविद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर, कर्ण शर्मा, हरभजनसिंग, मिचेल सॅन्टेनर, मोहीत शर्मा, इम्रान ताहीर, चैतन्य बिष्णोई,डी जे ब्रावो, स्कॉट कुगेलीन, सॅम बिललिंग्स, आणि ध्रुव शोरे.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

LEAVE A REPLY

*