आयपीएल १२ : कोण मारणार विजयाचा षटकार?

0

नवी दिल्ली : आयपीएल १२ मध्ये गुरुवारी १८ एप्रिल २०१९ रोजी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना रात्री ८ वाजता होणार आहे. दिल्ली आणि मुंबई दोन्ही संघाचे ८ सामने झाले असून, दोन्ही संघांनी ५ विजय आणि ३ पराभव स्वीकारले आहेत.

दिल्ली संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीने मुंबईचा ३७ धावांनीं पराभव केला होता. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबई मैदानात उतरेल तर दिल्ली मुंबईवर पुन्हा मात करून आपला विजयी सिलसिला कायम राखण्यासाठी उत्सुक असेल.
दिल्ली हे मैदान आकाराने लहान असल्यामुळे येथे चौफेर चौकार आणि षटकारांची आतषबाजी होणार आणि क्रिकेट चाहत्यांना एक रोमांचक लढत पाहायला मिळणार अशी शक्यता आहे.

येथे एकूण ४८ हजार प्रेक्षक बसू शकतात. रणजी संघ दिल्ली आणि आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्स या संघांचे हे घरचे मैदान आहे. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९२ असून ही धावसंख्या चेन्नई सुपरकिंग्जने २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध उपउपांत्यपूर्व सामन्यात उभारली होती.

तर नीचांकी धावसंख्या १२० असून ही धावसंख्या श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २६ मार्च २०१६ मध्ये उभारली होती. या मैदानावरील सर्वात मोठा विजय भारत ५३ धावांनी विरुद्ध न्यूझीलंड १ नोव्हेंबर २०१७ निसटता विजय इंग्लंड १० धावांनी विरुद्ध श्रीलंका २६ मार्च २०१६ या मैदानावर सर्वाधिक धावा जेसन रॉय ३ सामने १२५ १ अर्धशतक सर्वाधिक स्कोर ७८ विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने २०१८ हंगामात कोलकाताविरुद्ध शानदार शतक ठोकले होते.

हवामान : ६५% उष्णता राहण्याचा अंदाज

दिल्ली मुंबई आमनेसामने एकूण २२ वेळा १२ विजयी दिल्ली, १० विजयी मुंबई.

यांच्यावर असेल लक्ष : पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, क्रिस मॉरिस, किरॉन पोलार्ड.

मुंबई इंडियन्स : रोहीत शर्मा, क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, आदित्य तारे, युवराजसिंग, अनुकूल रॉय, अनमोलप्रीतसिंग, रसिख सलाम, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, बेन कटिंग, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इविन लुईस, राहुल चाहर, बरिंदर सरण, पंकज जयस्वाल, लसिथ मलिंगा, जेसन बेरेंडॉफ, मिचेल मॅक्लेनघन, जसप्रीत बुमरा, ऍडम मिल्ने दुखापतीने बाहेर.

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, शिखर धवन, कोलिन मुनरो, कोलिन इंग्राम, क्रिस मॉरिस, अक्षर पटेल, रिषभ पंत, बंडारू अय्यप्पा , आवेश खान, अंकुश बेन्स, ट्रेंट बोल्ट, किमो पॉल, कांगिसो रबाडा, मंजोत कार्ला, संदीप लॅम्मीचाने, हर्षल पटेल, ईशांत शर्मा, अमित मिश्रा, शेरफने रुदरफोर्ड, नथहू सिंग, जलज सक्सेना, राहुल तेवतीया, हमुमा विहारी.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

LEAVE A REPLY

*