Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

भारत २०११चा विश्वचषक जिंकला तेव्हाची गोष्ट

Share

मुंबई :  एप्रिल ही तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही घर करून आहे. कारण २०११ साली मुंबईच्या वानखेडे मैदानावर टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वात तब्बल २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला होता. याआधी १९८३ मध्ये कपिल देवच्या नेतृत्वात भारताने ६० षटकांचा विश्वचष जिंकला होता.  

२००३ मध्ये अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर भारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले होते. त्यानंतर २००७ मध्ये भारताला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळे भारतीय समर्थकांनीं भारतीय संघातील खेळाडूनचे फलक रस्त्यावर जाळून आपला संताप व्यक्त केला.

या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेत याच वर्षी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या टी २० विश्वचषकावर भारताने धोनीच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले होते. म्हणून भारतीय निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद धोनीच्या हाती सोपवले. त्याच्या नेतृत्वात भारताने सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका आणि २०१० मध्ये आशिया चषक पटकावला यंदाच्या विश्वचषकाचे आयोजन भारतातच करण्यात आले होते. 

विश्वचषकासाठी भारतीय संघात सचिन तेंडुलकर, गौतम  गंभीर, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, युसूफ पठाण, युवराज, धोनी, रैना यांच्यासारखे उत्तम फिनिशर्स, गोलंदाजीत आर अश्विन, हरभजन, आशिष नेहरा, झहीर खान, मुनाफ पटेल हा संघ विश्वचषकात सहभागी झाला. संघाचे नवीन प्रशिक्षक म्हणून ग्यारी क्रस्टन यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

भारतीय संघाला पहिला सामना करावा लागला. तो बांगलादेशचा २००७ मध्ये भारताला बांगलादेशने पराभूत केले होते. या पराभवाचा बदला भारताने घेतला. भारताने बांगलादेशला नमवले.  सेहवाग, कोहली यांनी शानदार अर्धशतके ठोकली भारताचा इंग्लंडविरुद्धचा सामना टाय झाला. या सामन्यात सचिन तेंडुलकर याने शानदार शतक ठोकले. गंभीरनेही  ६९ धावा केल्या सलगच्या  विजयांमुळे जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला.

 यानंतर भारताने विंडीजला पराभूत करून पुन्हा आपली गडी रुळावर आणली.   उपउपांत्यपूर्व  सामन्यात  भारताचा  सामना  झाला  तो  कांगारूंशी  ऑस्ट्रेलियाकडून  कर्णधार  रिकी  पॉंटिंगने झळकावलेल्या  शानदार  शतकामुळे  ऑस्ट्रेलियाने  भारताला  विजयासाठी  २६० धावांचे  आव्हान  दिले  भारताकडून गंभीर , सचिन  यांनी  शानदार  अर्धशतके  झळकावली  युवराज  आणि  रैनाने  खेळी  करून  भारताला उपांत्य  सामन्याचे  तिकीट  मिळवून  दिले  यात  भारताची  पाकिस्तानशी गाठ  पडली. 

  भारताने  प्रथम फलंदाजी करताना २६० धावा  केल्या पण  पाकिस्तानला  २३० धावाच  काढता आल्या  भारत  आता  विश्वविजेतेपदापासून  केवळ पाऊल  दूर  होता  या सामन्यात  श्रीलंकेने  प्रथम  फलंदाजी  करताना  ५० षटकात   बाद  २७४ अशी  आव्हानात्मक धावसंख्या  उभारली  श्रीलंकेकडून  जयवर्धने  १००, कर्णधार  संगकारा  ४८ धावा  केल्या  हा  सामना  वानखेडे  मैदानावर पार  पडत  असल्याने  सचिन  मोठी  खेळी  करणार  अशी  भारतीय  समर्थकांना  आशा  होती  सलामीवीर  सेहवाग भोपळाही  फोडू  शकला  नाही. 

 त्याला  लसिथ  मलिंगाने  पायचीत  केले  सचिनलाही  मलिंगाने  १८ धावांवर  यष्टीरक्षक  कर्णधारकरवी झेलबाद  केले    संपूर्ण  मैदानात  चिंतेचे  वातावरण  तयार  झाले  धोनी  पहिल्यांदाच  चौथ्या  क्रमांकावर  फलंदाजीसाठी  आला  या संपूर्ण  स्पर्धेत  तो  काही  खास  कामगिरी  करू  शकला  नवहता  त्याने  गंभीर  सोबत  निर्णायक  भागीदारी  रचून  भारताच्या  विजयाचा  पाया  रचला  गंभीरने  ९७, धावा  केल्या  गंभीर  परेराच्या गोलंदाजीवर  त्रिफळाचीत  झाला  युवराज  धोनीने  भागीदारी  रचली.

धोनीने  षटकार  मारून  भारताचे  विश्वचषक  विजयाचे  स्वप्न  साकार  झाले  हा  संपूर्ण  टीमवर्क  होता  भारताच्या विजयनंतर  मास्टर  ब्लास्टर  सचिनला  अश्रू  अनावर  झाले. युवराजला  मालिकावीर  तर  धोनीला  सामनावीर  पुरस्कारने सन्मानीत  करण्यात  आले संपूर्ण  देशभरात  फटाक्यांच्या  अताषबाजीसहीत मोट्या प्रमाणात  जल्लोष  करण्यात  आला

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!