आरपी सिंग करणार क्रिकेटला अलविदा

0

मुंबई : भारतच द्रुतगती गोलंदाज आणि २००७ साल च्या टी-२० विश्वचषकात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आरपी सिंगने निवृत्तीची घोषणा केली आहे. ३२ वर्षांचा वेगवान गोलंदाज असलेल्या आरपीनं ट्विटरवरून हा निर्णय घेत असल्याची माहिती दिली आहे.

आरपी सिंग पहिली आंतरराष्ट्रीय मॅच ४ सप्टेंबर २००५ ला खेळला होता. यानंतर बरोबर १३ वर्षांनी म्हणजेच ४ सप्टेंबर २००५ ला आरपी सिंगनं निवृत्ती घेतली. आरपी सिंगनं ६ वर्ष भारताकडून ८२ मॅच खेळल्या आणि १०० विकेट घेतल्या.

भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर यांचं दिवशी म्हणजेच ४ सप्टेंबर २००५ ला पहिल्यांदाच भारताची जर्सी घातली होती, असं म्हणत आरपी सिंगनं ट्विटरवर भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आरपी सिंगनं त्याचं कुटुंब, बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघाला धन्यवाद दिले आहेत.

आता युवा खेळाडूंसाठी जागा खाली करण्याची वेळ आली आहे, असं ट्विट आरपी सिंगनं केलं आहे.

LEAVE A REPLY

*