इंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त

0

लंडन : इंग्लंडने कसोटी सामना जिंकल्यानंतर इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भारताविरुद्ध ओव्हलमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यानंतर अलविदा करणार आहे.

सध्या १२२५४ धावा आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १६० सामन्यांत कुकच्या नावे जमा आहेत. त्याने आपल्या १६० कसोटी सामन्यात ३२ शतके आणि ५६ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने सर्वाधिक ५९ कसोटींमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले आहे. कुक गेल्या काही दिवसांपासून धावांसाठी झगडताना दिसला.

तसेच भारतविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्येही त्याला नावाला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळेच निवृत्ती त्याने जाहीर केल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विचार करून निवृत्तीचा निर्णय घेतला असल्याचे कुकने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*