Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड

Share

मुंबई : क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कार अष्टपैलू रवींद्र जडेजा यास जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी पुरस्कार निवड समितीने हि घोषणा केली आहे.

दरम्यान अर्जुन पुरस्कारासाठी १९ क्रिकेटपटू पैकी भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पॅरा ऍथलेट दीपा मलिक व कुस्तीपटू बजरंग पुनिया यांची राजीव गांधी खेलरत्नपदासाठी निवड करण्यात आली आहे.

जडेजाने भारताकडून १६६ एकदिवसीय सामने, टी-२० ४२ आणि ४१ कसोटी सामने खेळल्या आहेत आणि तीन स्वरूपात अनुक्रमे २१२८, १३५आणि १४८५ अशा धावा केल्या आहेत.
येत्या २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलरत्न, अर्जुन आणि द्रोणाचार्य क्रीडा पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!