क्रिकेटर शमीची पत्नी हसीनचे मॉडेलिंग क्षेत्रात प्रदार्पण

0

कोलकाता : भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ गेल्या वर्षभर आपांपसातील वादामुळे चर्चेत राहीले. परंतु, यावेळी मात्र हसीन जहाँ वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आली आहे. क्रिकेटर मोहम्मद शमीवर फसवणूक, बलात्कार व हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करणारी त्याची पत्नी हसीन जहाँने पुन्हा मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. शमीपासून विभक्त झाल्यानंतर हसीन जहाँला सन्मानाने जगायचं आहे. तीन वर्षाच्या मुलीची जबाबदारीही तिच्यावर आहे. यामुळे आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी चार वर्षांनंतर पुन्हा मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं तिने सांगितलं आहे.

शमीचे अनेक तरुणींशी विवाहबाह्य संबंध असून त्याचा मॅच फिक्सिंगमध्येही सहभाग असल्याचा आरोप तिने केला होता. तसेच शमीने त्याच्या भावाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती केली आपली हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. असा आरोप तिने शमीवर केला होता. शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. बीसीसीआयनेही शमीला क्लीन चीट दिली होती. त्यानंतर हसीनने शमीने दरमहा १० लाख रुपये पोटगी द्यावी अशी मागणी न्यायालयात केली होती. हा खटला न्यायालयात सुरू असून यावर अद्याप सुनावणी बाकी आहे. यामुळे हसीनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शमी आयुष्यात परत येणार नाही असं दिसल्यानंतर हसीन जहाँनं आपल्या करिअरबद्दल पुन्हा विचार सुरू केलाय. नुकतंच तिनं आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्टही केलीय. या व्हिडिओत हसीन जहाँ बोल्ड लूकमध्ये एक फोटोशूट करताना दिसतेय. उल्लेखनीय म्हणजे, मोहम्मद शमीसोबत विवाहापूर्वीही हसीन मॉडलिंग क्षेत्रात कार्यरत होती आणि आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्सची चीअरलीडरही होती.

LEAVE A REPLY

*