२०१९ विश्वकरंडक  क्रिकेट  स्पर्धेचे  वेळापत्रक  जाहीर

0

नाशिक | प्रतिनिधी

इंग्लंड मध्ये  येत्या  ३० मे  ते  १४ जुलै २०१९ या कालावधीत  खेळवल्या  जाणाऱ्या  ५० षटकांच्या  विश्वकरंडक  क्रिकेट  स्पर्धेचे  वेळापत्रक  जाहीर  करण्यात  आले आहे. यात  एकूण  १० संघ  सहभागी  होणार  आहेत.  साखळी  सामन्यांमध्ये प्रत्येक  संघ  एकूण  ९ सामने  खेळणार  आहे.  ३० मे  ते  ६ जुलै  दरम्यान  साखळी  सामने  होणार आहेत.

तर  बाद  फेरीच्या  सामन्यांना  ९ जुलै  पासून  सुरुवात  होणार  आहेत.  ३० मे  रोजी  स्पर्धेचा  उदघाटनाचा  सामना  इंग्लंड  विरुद्ध  दक्षिण  आफ्रिका  या दोन  संघांमध्ये  होणार  आहे.  तर  अखेरचा  साखळी  सामना  ऑस्ट्रेलिया  विरुद्ध  दक्षिण  आफ्रिका  या दोन  संघांमध्ये  ६ जुलै  रोजी  खेळवण्यात  येणार  आहे.

ऑस्ट्रेलिया  संघाने  तब्बल  ५ वेळा  विश्वकरंडक  जिंकला  आहे.  तर  भारत  आणि  विंडीज  या संघांनी  दोन  वेळा  स्पर्धा  जिंकली आहे.  पाकिस्तान  आणि  श्रीलंका  या दोन  संघांनी  १ वेळा  ‘किताब  पटकावला  आहे.  मात्र,  दक्षिण  आफ्रिका, इंग्लंड , न्यूझीलंड  यांना  विश्वकप  जिंकता  आलेला  नाही. सामन्याचे  थेट  प्रक्षेपण  स्टार  स्पोर्ट्स  आणि  हॉटस्टारवर…

स्पर्धेचे  वेळापत्रक  पुढीलप्रमाणे…

३० मे  इंग्लंड  विरुद्ध  दक्षिण  आफ्रिका  दुपारी  २: ३० वाजता

३१ मे  पाकिस्तान  विरुद्ध  विंडीज  दुपारी २: ३० वाजता

१ जून  न्यूझीलं   ड  विरुद्ध  श्रीलंका  आणि

अफगाणिस्तान  विरुद्ध  ऑस्ट्रेलिया सायंकाळी    ५: ३० वाजेपासून

२ जून  आफ्रिका  विरुद्ध  बांगलादेश  २: ३०

३ जून    पाकिस्तान  विरुद्ध  इंग्लंड  २: ३०

४ जून   अफगाणिस्तान  विरुद्ध श्रीलंका  २: ३०

५ जून  आफ्रिका  विरुद्ध  भारत  २: ३० आणि

बांगलादेश  विरुद्ध  न्यूझीलंड  ५; ३०

६ जून    ऑस्ट्रेलिया  विरुद्ध  विंडीज  २: ३०

७ जून       पाकिस्तान  विरुद्ध  श्रीलंका  २;३०

८ जून         इंग्लंड  विरुद्ध  बांगलादेश  २;३० आणि

अफगाणिस्तान  विरुद्ध  न्यूझीलंड

९ जून           भारत  विरुद्ध  ऑस्ट्रेलिया  २: ३०

१० जून         आफ्रिका  विरुद्ध  विंडीज  २:३०

११ जून          श्रीलंका  विरुद्ध  बांगलादेश  २:३०

१२ जून         ऑस्ट्रेलिया  विरुद्ध  पाकिस्तान  २:३०

१३ जून         भारत  विरुद्ध  न्यूझीलंड  २;३०

१४ जून          इंग्लंड  विरुद्ध  विंडीज  २:३०

१५ जून         श्रीलंका  विरुद्ध  ऑस्ट्रेलिया  २:३०

१६ जून          भारत  विरुद्ध  पाकिस्तान  २:३०

१७ जून          विंडीज  विरुद्ध  बांगलादेश  २:३०

१८ जून          इंग्लंड  विरुद्ध  अफगाणिस्तान  २;३०

१९ जून          न्यूझीलंड  विरुद्ध  आफ्रिका    २:३०

२० जून           ऑस्ट्रेलिया  विरुद्ध  बांगलादेश  २:३०

२१ जून            इंग्लंड  विरुद्ध  श्रीलंका  २:३०

२२ जून           भारत  विरुद्ध  अफगाणिस्तान २:३०

विंडीज  विरुद्ध  न्यूझीलंड  ५:३०

२३ जून      पाकिस्तान  विरुद्ध  आफ्रिका  २:३०

२४ जून       बांगलादेश  विरुद्ध  अफगाणिस्तान २:३०

२६ जून       पाकिस्तान  विरुद्ध  न्यूझीलंड  २:३०

२७ जून        विंडीज  विरुद्ध  भारत २;३०

२८ जून         श्रीलंका  विरुद्ध  आफ्रिका  २;३०

२९ जून        न्यूझीलंड  विरुद्ध  ऑस्ट्रेलिया  ५:३०

३० जून          इंग्लंड  विरुद्ध  भारत    २:३०

१ जुलै           श्रीलंका  विरुद्ध  विंडीज  २:३०

२ जुलै            बांगलादेश  विरुद्ध  भारत  २:३०

३ जुलै            इंग्लंड  विरुद्ध  न्यूझीलंड  २:३०

४ जुलै            अफगाणिस्तान  विरुद्ध  विंडीज  २:३०

६ जुलै             भारत  विरुद्ध  श्रीलंका  २:३०

९ जुलै             पहिला  उपांत्य  सामना  २:३०

११ जुलै            दुसरा  उपांत्य  सामना  २:३०

१४ जुलै             अंतिम  सामना    २: ३०

असे  आहेत सामन्यांचे ठिकाण : : चेस्टर  ले  स्ट्रीट , लीड्स , मँचेस्टर , बर्मिंघम , नॉटिंगहॅम ब्रिस्टॉल , ओव्हल कार्डिफ , लॉर्ड्स  आणि  साऊथ  आयॅमटॅन

सलिल  परांजपें  नाशिक   

LEAVE A REPLY

*