Blog : भारतीय संघाची कसोटी ; इंग्लंडचे पारडे जड

0

टी -२० वनडे मालिकेचा थरार आटोपून आता यजमान इंग्लंड व भारत पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत आपले नशिबा आजमवण्यासाठी उतरणार आहेत.

भारतीय संघाकडे फलंदाजीत विविध पर्याय आहेत. मात्र जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार हे सध्या दुखापतग्रस्त आहेत. आशा परिस्थितीत इशांत शर्मा व मो, शमीवर भारतीय गोलंदाजीची भिस्त आहे. शिवाय सर्व सामन्यात शिखर धवन शून्यावर बाद झाला. होता तर पुजाराला केवळ एक धाव करता आली होती. जमेची बाजू म्हणजे कोहली, कार्तिक , राहुल आपण फार्मात असल्याचे स्पष्ट केले होते, तर इशांत व शमीला केवळ दोन गाडी टिपता आले.

तर दुसरीकडे बर्मिंगहॅम हे मैदान हे फार फलदायी ठरलेले आहे. इंग्लंडने आतापर्यंत भारतासोबत ३२ सामने खेळले असून यात २५ सामन्यात इंग्लंड विजयी झाला आहे. तर भारताला २ सामने जिंकता आले आहेत. ५ अनिर्णित झाले आहेत. जो रूटला कर्णधाराला फार उत्तम लय गवसली आहे. तर डोकेदुखी म्हणजे माजी कॅप्टन अलिस्टर कुक हा धावांसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे कुकसोबत सलामीला कोण ? असा प्रश्न इंग्लंडसमोर आहे.

यांच्यावर असू शकते नजर मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, भारताचे प्रमुख गोलंदाज रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मो. शमी, इशांत शर्मा, उमेश यादव
इंग्लंडचे खास खेळाडू अलिस्टर कुक, जो रूट, जॉनी बॅरिस्टरो, मोईन अली, आदिल रशीद
इंग्लंडचे हवामान उष्ण असल्याने येथे चेंडू स्विंग करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. भारतासाठी प्रथम फलंदाजी केल्यास ५००+ भारतीय गोलंदाजांना २० विकेट्स काढण्यासाठी लढावे लागेल.

हा सामना बर्मिंगहॅम येथे होत असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडे तीन वाजता सुरु होईल.

(शब्दांकन : सलील परांजपे )

LEAVE A REPLY

*