Type to search

मुख्य बातम्या हिट-चाट

शाहिद कपूरच्या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान तरुणाचा मृत्यू

Share
मुंबई : अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी ‘कबीर सिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका क्रू मेंबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तराखंडमधील मसुरी इथं या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. शूटिंगदरम्यान जनरेटरचं काम पाहणाऱ्या ३५ वर्षीय राम कुमार याचा मृत्यू झाला.

शूटिंगदरम्यान सेटवर जनरेटर मागवण्यात आला होता. त्या जनरेटरमधील पाण्याची पातळी तपासण्यास गेला असता राम कुमारचा मफलर जनरेटरच्या पंख्यात अडकला. मफलरमुळे तोसुद्धा पंख्यात ओढला गेला. या अपघातात राम कुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

राम कुमार असं मृताचं नाव असून तो 35 वर्षांचा होता. मुजफ्फरनगरच्या किनोनी गावाचा तो राहिवासी होता. मृताच्या कुटुंबीयांना घटनेबाबत कळवल्याचं पोलिसांनी सांगितलं. या दुर्घटनेनंतर चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. ही घटना घडली त्यावेळी शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी तिथे उपस्थित नव्हते

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!