गृहप्रकल्प क्षेत्रात पुन्हा तेजीचे दिवस; क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्स्पोतील सूर: तीन दिवस प्रदर्शन

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेरा कायद्यामुळे बांधकाम क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला असून पारदर्शकतेमुळे घर खरेदीचे व्यवहार सुरळीत होईल याचा विश्‍वास ग्राहकांना आहे. बँकांनीही गृह कर्जाचे व्याजदार कपात केल्याने त्याचा फायदा गृहप्रकल्पांना झाला आहे. घर खरेदीदारांच्या संख्येत जवळपास 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे गृहप्रकल्प क्षेत्रात पुन्हा एकदा तेजीचे दिवस आले असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी मांडले.

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो 2017 चे कदम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजक नरेंद्र फिरोदिया, एक्स्पोचे चेअरमन गिरीष आग्रवाल, क्रेडाईचे अध्यक्ष संजय गुगळे यांच्यासह नामांकित बिल्डर यावेळी उपस्थित होते. 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
झोपडी कॅन्टीनमागील सेंट मोनिका अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात हे एक्स्पो भरविण्यात आले आहे. आज शुक्रवारी सकाळी त्याचे उद्घाटन झाले. रेरा अंतर्गत नोंदणी झालेले व रेप्युटेड 30 बिल्डरांनी यात सहभाग घेतला आहे. नगर शहर व परिसरातील त्यांचे 50 गृहप्रकल्प या एक्स्पोत ग्राहकांसमोर ठेवण्यात आले आहे. ग्राहक स्वत: गृहप्रकल्पाचा शोध घेऊन चौकशी करत असतात. त्यांना एकाच ठिकाणी शहरातील सर्व गृहप्रकल्पाची माहिती मिळावी तसेच बांधकाम क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास एक्स्पोचा हातभार लागणार आहे. अशिष पोखरर्णा, प्रकाश मेहता, रवींद्र मुळे, मकरंद कुलकर्णी, अमित वाघमारे, विक्रम जोशी, सचिन कटारिया, दीपक बांगर हे रेप्युटेड बिल्डर एक्स्पोच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

LEAVE A REPLY

*