कसारा घाटात दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

0

इगतपुरी | पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात दरवर्षी साडेतीन ते चार हजार मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद होत असते.

गत एक आठवड्यापासुन सुरु असलेल्या संततधार आणि मुसळधार पडत असणाऱ्या या अती पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरवर्षी दरडी कोसळुन महामार्ग नेहमीच ठप्प होत असतो.

आजही पहाटेच्या सुुमारास मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या महामार्गावरील जुन्या कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

यामुळे सुमारे एक तास वाहतुकीची कोंडी झाली. मात्र घोटी  टोलप्लाझाच्या कर्मचारी उमेर शेख, रवि देहाडे, विजय कुंडगर, सचिन भडांगे, संदीप म्हसणे, शेखर गायकवाड, वसीम शेख, राजु मोरे आदींनी तातडीने घटनास्थळी धाव घेवुन रस्त्यात पडलेला माती व दगडाचा मलबा बाजुला करून दरड कोसाळलेल्या ठीकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणुन बॅरीगेट लावून वाहतुक पुर्वपदावर आणली.

सध्या कसारा घाटात पावसामुळे डोंगर उतारावरून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे ठीक ठीकाणी धबधबे तयार झाले आहेत.

या धबधब्याचे आकर्षण घाटातुन प्रवास करणाऱ्या प्रवाशी व पर्यटकांना आकर्षण ठरत असुन प्रवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन वाहनातुन उतरुन फोटो व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*