चारा खाल्ला म्हणून गाईला शॉक देवुन मारले

0
कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- गावातील देव गायीने चारा खाल्ल्याचा राग येवून गाईला विजेचा शॉक देवुन मारले व बेवारस अवस्थेत वनविभागाच्या काटवणात फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मोर्विस येथे घडली आहे.या घटनेने परीसरात संतापाची लाट पसरली आहे. हे दृष्टकृत्य करणार्‍या आरोपींची गांवात दहशत आहे. आरोपीं वाळू तस्कर असल्याने गुन्हा घडून पंधरा दिवस उलटले तरीही आरोपींला अटक होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मोर्विस येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, आमचे गांवात एक देव गाय होती, तीचा कोणाला त्रास नव्हता ती गाभण होती दि 22 जुलै 2017 शनिवारी मध्यरात्री गायीने चारा खाल्ल्याचे निमित्त करुन गांवातील एका इसमाने इलेक्ट्रिक शॉक दिले शॉक देतांना गाय अतिशय आर्त स्वरात किंचाळत होती. तिने मोठा हंबारडा फोडला. इलेक्ट्रिक शॉक मुळे गाय जागेवरच मयत झाली.
एवढे करुन हे आरोपी थांबले नाही तर या गायीला चर्‍हाटाने गळफास देवून तीस ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढीत फरफटत नेत सदर गायीला गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या एक ते दिड कि मि वरील फॉरेस्ट मध्ये काटवनात बेवारस अवस्थेत टाकून दिले. आरोपीं वाळूतस्कर असून गांवात दहशत आहे. त्यामुळे या घटनेची कुठे वाच्यता झाली नाही. घटना स्थळी पोलीस आले त्यांनी गायीचा पंचनामा केला व मृत गायीचा व्हिसेरा नासिक येथे पुढील तपासणीसाठी पाठविला. या घटनेची तातडीने चौकशी व्हावी व गुन्हेगारांना शासन व्हावे म्हणून गांवकर्‍यांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

*