ई-पास साठी ‘कोविड-१९’ पोर्टल’ची निर्मिती; अत्यावश्यक सेवेसाठी अर्ज करावेत – जिल्हाधिकारी

ई-पास साठी ‘कोविड-१९’ पोर्टल’ची निर्मिती; अत्यावश्यक सेवेसाठी अर्ज करावेत – जिल्हाधिकारी

नाशिक | प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यातील १५ प्रकारच्या अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा-सुविधांना परवानगी देण्यात आली आहे. या सेवा-सुविधांमधील उद्योग आस्थापनांनी आपल्या अधिकारी, कर्मचारी यांच्या ई-पासेससाठी जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळ ‘कोविड-१९’ या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

लॉकडाऊन कालावधीत आरोग्य सेवा,शेती व त्यासंबंधीत उपक्रम, वित्तीय सेवा, सामाजिक स्वरूपाच्या सेवा, ऑनलाईन व डिस्टन्स एज्युकेशन, मनरेगा, सार्वजनिक उपयोगितेची कामे, राज्यांतर्ग व बाहेर मालवाहतुक, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा,  वाणिज्य व खाजगी आस्थापना सरकारी व खाजगी उद्योग, अनुज्ञेय बांधकामे, आपत्कालीन वाहतुक, सरकारची अधिनस्त, स्वायत्त व दुय्यम कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये या १५ प्रकारच्या सेवा-सुविधांचा समावेश आहे.

त्यासाठी सुरू ठेवण्यासाठी आवश्यक पास देण्यासाठी सोय करण्यात आली असून संबंधीत यंत्रणांनी संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज सादर करावेत. या सर्व अर्जांची रितसर ऑनलाईन पडताळणी करून ई-पास वितरित केले जातील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com