Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रकरोना बाधित रुग्णांची सेवा करण्याच्या अटीवर मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरला जामीन

करोना बाधित रुग्णांची सेवा करण्याच्या अटीवर मोक्का गुन्ह्यातील डॉक्टरला जामीन

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – करोना बाधित रुग्णांची सेवा करण्याच्या अटीवर मोक्का गुन्ह्यातील डॉक्टर आरोपीला जामीन देण्यात आला आहे.
येथील येरवडा कारागृहात गेल्या एक वर्षापासून मोक्का अंतर्गत शिक्षा भोगणार्‍या डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांना पुणे सत्र न्यायालयात तीस तारखेला जामीन दिला आहे.

- Advertisement -

राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास मंडळाचे अध्यक्ष यांना 30 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ते कारागृहात शिक्षा भोगत आहेत. भिसे यांनी कोविड रुग्णांची सेवा करण्यासाठी जमीन अर्ज केला होता, व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे सुनावणी झाल्यानंतर 25 हजाराच्या बॉण्डवर दोन महिन्याचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.

ससून रुग्णालयात करोना रुग्णांवर आठवड्यात पाच दिवस सेवा करण्याची अट त्याचबरोबर साक्षीदारांवर दबाव टाकू नये, मुदत संपण्यापूर्वी कारागृहात हजार व्हावं या अटींना अधीन राहून हा जमीन देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या