पत्नीस जाळून मारणार्‍या पतीला जन्मठेप

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – जामखेड येथे पत्नीच्या अंगावर अंगावर रॉकेल टाकून तिला पतीनेच ठार मारले होते. याप्रकरणी दोषी धरत जिल्हा न्यायाधीश श्रीमंगले यांनी तुकाराम शिवराम ढेपे यास जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
15 सप्टेबर 2016 रोजी शोभा तुकाराम ढेपे ही महिला घरात काम करीत होती. या दरम्यान आरोपी तुकाराम घरात मद्य प्राशन करून आला. त्याने घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून शोभा हिला शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली. दरम्यान, तिने पतीस विरोध करण्याचा प्रयत्न असता आरोपीने घरातील रॉकेलचा डब्बा घेऊन पत्नीच्या अंगावर ओतला व पेटवून दिले.
ही घटना नागरिकांना समजली असता त्यांनी शोभा यांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. घटनेतील शोभचे मृत्यूपूर्व जबाब, सहायक फौजदार जे. जी. बटुळे, नायब तहसीलदार एस. एस. पाखरे,
डॉ. सोनवणे, डॉ. कुलकर्णी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षेचे वकील केदार केसकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तुकाराम शिवराम ढेपे यास जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यात जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सरोदे व राहुल पवार यांनी साहाय्य केलेे.

LEAVE A REPLY

*