लहान मुलांच्या वादातून खून ; दोघांना जन्मठेप

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथे किरकोळ भांडणाच्या कारणाहून एका तरुणाचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोषी धरुन जिल्हा सत्र न्यायाधीश अभीश्री देव यांनी दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे. सुरेश रंगनाथ शिंदे (वय 45) व सविता सुरेश शिंदे (वय 35) अशी आरोपींची नावे आहेत.
सन 2015 मध्ये रेश्मा शिंदे व सविता शिंदे यांच्यात लहान मुलांच्या वादातून भांडणे झाली होती. हा वाद त्या दिवशी मिटला होता. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा एकमेकांवर आरोपी प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी सुरेश शिंदे याने घरातून कुर्‍हाड आणून वत्सलाबाई शिंदे यांच्या डोक्यात मारली होती.
तसेच सविता शिंदे हिने लाकडी दांड्याने मारहाण केली होती. यात वत्सलाबाई यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी शिवाजी दिनकर शिंदे यांनी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक वाखारे यांनी घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
हा खटला जिल्हा सत्र न्यायाधीश अभीश्री देव यांच्यासमोर सुरू होता. सरकार पक्षार्फे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्याक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपासी अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाचे वकील ऍड. अनिल घोडके यांचा युक्तीवाद ग्राह्यधरुन न्यायाधीश अभीश्री देव यांनी आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपयांची शिक्षा ठोठावली आहे.

LEAVE A REPLY

*