बंटी जहागिरदारच्या हद्दपारीचा आदेश उच्च न्यायालयाने रद्द ठरविला

0

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- गुन्हेगारी पार्श्‍वभूमी दाखवून बंटी जहागिरदार याचेविरुध्द जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला हद्दपारीचा आदेश उच्च न्यायालयाचे औरंगबाद खंडपिठाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाने यांनी रद्द ठरविला आहे.
असलम उर्फ बंटी शब्बीर शेख याच्या विरुध्द गुन्हेगारी स्वरुपाचे विविध गुन्हे दाखवून पोलिसांनी हद्दपारीचे आदेश तयार करुन जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला.

जिल्हाधिकार्‍यांनी बंटी जहागिरदार यास पुणे, अहमदनगर या दोन जिल्ह्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुके तर पुणे व नाशिक या ठिकाणाहून दोन वर्षाकरिता हद्दपारीचा आदेश प्रांताधिकार्‍यांनी बजावला होता. त्याविरुध्द बंटी जहागिरदार यांनी नाशिक आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले परंतु जिल्हाधिकार्‍यांचा आदेश कायम ठेवत नाशिक आयुक्तांनी बंटी जहागिरदार यांचे विरुध्द दोन वर्षाकरिताची हद्दपारी कायम ठेवली.

त्यानंतर बंटी जहागिरदार यांनी औरंगाबाद खंडपिठाच्या उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
यात आरोपीचे वकील अ‍ॅड. श्रीमती पी. एस. तळेकर, अ‍ॅड. तळेकर यांनी बंटी जहागिरदार याचेविरुध्द असलेल्या अनेक गुन्ह्यातून त्यांची निर्दोष सुटका झालेली आहे. श्रीरामपुरात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यात त्यांना बळजबरीने अडकविण्यात आले आहे याबाबतची सुनावणी उच्च न्यायालयात सुरु आहे. बंटी जहागिरदारची आता कोणतीही पार्श्‍वभूमी नसल्याचे पटवून दिले. यावेळी अ‍ॅड. मजहर जहागिरदार यांनी सहकार्य केले.

उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. शिंदे व न्या. एस. एम. गव्हाने यांनी सर्व बाजु ऐकून घेवून असलम उर्फ बंटी जहागिरदार यांचे विरुध्द जिल्हाधिकार्‍यांनी बजावलेला हद्दपारीचा आदेश रद्द ठरविण्यात येत असल्याचा आदेश दिला.

सध्या मी सामाजिक कामे करुन एक प्रतिष्ठेचे जीवन जगत आहे. पालिकेत नगरसेवकपदासाठी दुसर्‍यांना माझ्या आईला निवडून आणले. याद्वारे समाजसेवा हेच उद्दिष्ट माझ्यासमोर आहे. माझ्या विरोधातील काही राजकीय लोकांनी मी राजकारणात मोठा होवून त्यांना अडचण होवू नये म्हणून मला गुन्हेगारी क्षेत्रात अडकविण्यासाठी हा खटाटोप केला.  माझी हद्दपारी रद्द होवू नये म्हणून मला मुद्दाम कलम 307 च्या खोट्या गुन्ह्यात अडकविले. परंतु त्याविरुध्दही मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्याचाही निकाल माझ्या बाजुने लागणार आहे. सध्या मी सामाजिक कामे करुन एक प्रतिष्ठेचे जीवन जगत आहे. पालिकेत नगरसेवकपदासाठी दुसर्‍यांना माझ्या आईला निवडून आणले. याद्वारे समाजसेवा हेच उद्दिष्ट माझ्यासमोर आहे. माझ्या विरोधातील काही राजकीय लोकांनी मी राजकारणात मोठा होवून त्यांना अडचण होवू नये म्हणून मला गुन्हेगारी क्षेत्रात अडकविण्यासाठी हा खटाटोप केला.  माझी हद्दपारी रद्द होवू नये म्हणून मला मुद्दाम कलम 307 च्या खोट्या गुन्ह्यात अडकविले. परंतु त्याविरुध्दही मी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे त्याचाही निकाल माझ्या बाजुने लागणार आहे.     –       बंटी जहागिरदार

बंटी जहागिरदार यांना बजाविण्यात आलेला हद्दपारीचा आदेश रद्द होवू नये म्हणून काही दिवसापासून बंटी जहागिरदारविरुध्द कलम 307 चा खोटा गुन्हा दाखल करण्यात येवून अडकविण्याचा प्रयत्न झाला असून याविरुध्दही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावरचाही निर्णय लवकरात लवकर निकाली निघेल असे अ‍ॅड. मजहर जहागिरदार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*