Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशकात साकारणार टायरबेस मेट्रोप्रकल्प; देशातील पहिलाच प्रयोग

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवा मोठा काहीतरी प्रकल्प नाशिकमध्ये आणण्याच्या दृष्टीकोनातून नाशिकमध्ये टायरबेस मेट्रो प्रकल्प साकारण्यात येणार आहे. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आज यापार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हेही वाचा : नाशकात असे असणार मेट्रोचे जाळे

दरम्यान, एलिव्हटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून साकारण्यात येणारा टायरबेस प्रकल्प प्रथमच नाशिक शहरात राबविण्यात येणार आहे. यावेळी दीक्षित म्हणाले की, हा प्रकल्प नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असून महापालिकेचा यातील सहभाग कमीत कमी असणार आहे.

हेही वाचा : नाशिकमध्ये महामेट्रोच्या नियोजनाला प्रारंभ

प्रकल्पासाठी अंदाजे 1800 ते 2000 कोटींचा खर्च अपेक्षित असून हा खर्च केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार असलायचे दीक्षित म्हणाले.

‘मेट्रो-निओ’ची वैशिष्ट्ये 

  • २५/१८ मीटर वातानूकूलित विजेवर चालणारे कोच
  • २००/३०० प्रवासी क्षमता,
  • गंगापूर-नाशिक रेल्वे स्टेशन (२२ कि मी/ १९ स्थानके)
  • गंगापूर-मुंबई नाका (१० कि मी/१० स्थानके)
  • स्वयंचलित दरवाजे,
  • एकस्तर बोर्डिग (Level Boarding ),
  • आरामदायी आसने , प्रवासी माहिती फलक इत्यादि व्यवस्था.
  • स्थानकांवर जिना, उद्वाहक (Lift) आणि सरकता जिना ( Escalator)
  • रस्त्यांवर प्रवाशांविषयी माहितीचा डिस्प्ले.
  • मुंबई नाका व्हाया गरवारे ते सातपूर कॉलनी (१२ कि मी), नाशिक स्टेशन ते शिवाजीनगर व्हाया नांदूर नाका (१२ कि मी) या दोन मार्गावर बॅटरीचलित फिडर बस सेवा राहील.

डॉ. ब्रिजेश दिक्षीत, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, एन.के.सिन्हा, कार्यकारी संचालक, नाशिक मेट्रो प्रकल्प, डॉ. हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक (जनसंपर्क) आणि राईट्स (RITES) चे अधिकारी यांनी नाशिक मेट्रो प्रकल्पाच्या प्रस्तावित मार्गाची तपासणी ‍केली असून लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे.

याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, सीमा हीरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, आयुक्त राधाकृष्ण गमे यांची उपस्थिती होती.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!