Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

उद्या मतमोजणी, ईव्हीएमला कडेकोट बंदोबस्त

Share

पहिल्या तासाभरात होणार पोस्टल मतांची मोजणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीसाठी गुरूवारी (दि.24) सकाळी आठपासून विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीला सुरूवात होणार आहे. यावेळी पहिल्या तासाभरात पोस्टल मतांची मोजणी करण्यात येणार असून त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. मतदानानंतर जिल्ह्यातील 12 मतदारसंघातील ईव्हीएम मशीन कडेकोट बंदोबस्तामध्ये मोजणीच्या ठिकाणी सुरक्षीत ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दरम्यान, नगर शहर मतदारसंघातील मशीन एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ही मतमोजणी प्रक्रिया ही त्या-त्या विधानसभा मतदारसंघात होणार आहे. त्याची सर्व तयारीही सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी केली आहे. त्याठिकाणी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार आवश्यक त्या सर्व उपाययोजना मतमोजणी केंद्रांवर करण्यात आली आहे.

विशेषत: तेथील सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असणार आहे. तेथील मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही, व्हीडिओग्राफीची सुविधा, मतमोजणी केंद्रावर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती, मतमोजणी केंद्राच्या परिसरातील चोख सुरक्षा व्यवस्था अशा पद्धतीने आपण तयारी करण्यात आली आहे.

अकोले मतदारसंघाची मतमोजणी पॉलीटेक्निक कॉलेज, अकोले. संगमनेरची सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात स्पोर्टस कॉम्प्लेक्स, संगमनेर. शिर्डीची मतमोजणी राहाता येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत. कोपरगावची सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल, कोपरगाव. श्रीरामपूरची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय. नेवासाची मतमोजणी नवीन शासकीय गोडावून सेंट मेरी स्कूल जवळ, मुकींदपूर. शेवगावची मतमोजणी तहसील कार्यालय शेवगाव. राहुरीची मतमोजणी राहुरी कॉलेज. पारनेरची मतमोजणी न्यू आर्टस कॉमर्स आणि सायन्स कॉलेज पारनेर. श्रीगोंदा मतदारसंघाची मतमोजणी ही पेडगाव रोडवरील शासकीय गोदाम, श्रीगोंदा येथे तर कर्जत-जामखेडची मतमोजणी नवीन तहसील कार्यालय, कर्जत येथील शासकीय गोडावून येथे होणार आहे.

स्ट्राँगरुमला तेराशे पोलिसांचा बंदोबस्त
जिल्ह्यातील 12 मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी किरकोळ अपवाद वगळता सोमवारी शांततेत मतदान झाले. पोलिसांनी मतदानयंत्रे ठेवण्यासाठी उभारलेल्या स्ट्राँगरुमसाठी तेराशे पोलिस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त नेमला आहे. जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा पोलिस दलाने सुमारे 7 हजार पोलिसांचा बंदोबस्त दिला होता. किरकोळ अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये पोलिस उपअधीक्षकांचे पथक दिवसभर गस्त घालत होते तर अतिसंवेदनशील मतदारसंघामध्ये जागोजागी सशस्त्र पोलिस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

दरम्यान, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पोलिसांनी स्ट्राँग रुमला बंदोबस्त दिला आहे. बारा विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक स्ट्राँग रुमला सुमारे एकशे दहा कर्मचारी आणि चार अधिकार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्य राखीव पोलिस दल, सश्त्र सीमा दल आणि स्थानकि पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश असणार आहे. हा बदोबस्त काल सायंकाळपासून पुढील दोन दिवस राहणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्येक मतदारसंघातील स्ट्राँग रुमसाठी पोलिस निरीक्षक एक, उपनिरीक्षक तीन, सशस्त्र सीमा दलाचे 30 जवान, राज्य राखीव पोलिस दलाचे 30 जवान, 43 जिल्हा पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त राहणार आहे.

बंदोबस्त असा
बारा स्ट्राँग रुम
* पोलिस निरीक्षक 12
* पोलिस उपनिरीक्षक 36
* राज्य राखीव दलाचे 360 जवान
* सशस्त सीमा सुरक्षा दलाचे 360 जवान
* स्थानिक पोलिस कर्मचारी 550

उमेदवारांमध्ये धाकधूक
मतदानानंतर उमेदवार आणि समर्थकांची विजयासाठीची आकडेमोड सुरू आहे. कुणी काम केले आणि कुणी कुठे दगा दिला याची जोरदार चर्चा सुरू होती. नगर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात चुरस निर्माण झाल्याने काही ठिकाणी विजयाचा अंदाज येत नसल्याने अशा उमेदवारांची व त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. तर चुरसपूर्ण लढतीत काही उमेदवारांची ‘लॉटरी’लागणार असल्याने हे उमेदवार व त्यांचे समर्थक जाम खुशीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!