Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक

‘सुला फेस्ट’चा काऊंटडाऊन सुरू शहरात चैतन्याची झलक

Share

सातपूर । सुलाफेस्ट 2019 च्या काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे. संगीत प्रेमींना या महोत्सवात सहभागाविषयी उत्सुकता आहे. यंदाच्या बाराव्या हंगामात भरपूर नवनवीन गोष्टी सुलाफेस्टमध्ये अनुभवायला मिळणार आहेत. जगप्रसिद्ध बॅण्डस, नामांकित कलावंत, लज्जतदार पदार्थ, जग प्रसिद्ध वाईनसोबतच अन्य पेयांसह मनसोक्त धम्माल यंदाच्या सुलाफेस्ट मध्ये असणार आहे. यानिमित्त सुला विनियार्ड्स सोबतच संपूर्ण शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

2 व 3 फेब्रुवारीला सुला फेस्टच्या बाराव्या हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात प्रसिद्ध संगीतकार शंकर महादेवन यांच्यासह देश-विदेशातील गायक, संगीतकार सादरीकरण करणार आहेत. सुला फेस्टमध्येसहभागी होत असलेल्या देश-विदेशातील पर्यटकांमुळे शहरातील व्यवसायात लक्षणीय वृद्धी होते. फेस्टनिमित्त येणार्‍या पर्यटकांकडून आत्तापासूनच हॉटेल्स बुकींग केली जात आहेत.

हॉटेल व्यवसायाला मिळणारी मोठ्या प्रमाणातील चालना केवळ फेस्टकालावधीतच बघायला मिळते. यानिमित्त शहराला भेट देणार्‍या पर्यंतकांमध्येही वाढ होत आहे. पर्यटकांकडून शहरात दाखल होण्यापूर्वी शहराची माहिती इंटरनेट व अन्य माध्यमातून घेतली जाते. सहाजिकच फेब्रुवारीत नाशिक शहरासह विभागातील पर्यटनस्थळावर पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

दरवर्षी मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल्स चालक यांसह पर्यटनक्षेत्राशी निगडित अन्य व्यावसायिक जोमाने तयारीला लागले आहेत. सुलाविनियार्ड्सच्या प्रांगणातही फेस्टची तयारी गतीमान झाली आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सुमारे 1 हजार व्यक्तीची टीम परिश्रम घेते. मंडप, सजावट, संगीत व्यवस्था, सुरक्षा अशा अनेक पातळ्यांवर स्थानिक व्यावसायिकांना काम करण्यासह चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी मिळणार आहे.

सुलाफेस्टशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या हजारो व्यक्तीसाठी हा फेस्ट अविस्मरणीय ठरणार असल्याचे सुला विनियार्ड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे यांनी सांगितले. यात संगीतप्रेमी, स्थानिक व्यावसायिक, किंवा इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट सारख्या शाखांचे विद्यार्थी, प्रत्येकाकडे फेस्टची वेगळी आठवण साठवली जाणार आहे.

यामुळेच दर वर्षी अधिक जोमाने काम करत नाविन्यपूर्णता राखण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सुला फेस्टमुळे नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर पर्यटनस्थळ म्हणून अधिक ठळक झाले असल्याचा आपणास अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!