Type to search

धुळे संपादकीय

नगरसेवकांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

Share

धुळे  –

धुळ्यातील देवपूर भागात तब्बल 12 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही नळांना पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरसेवकांकडे कैफयत मांडली. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील तिनही नगरसेवकांनी नवरंग जलकुंभावर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले. पालिकेच्या शहर अभियंत्यांनी घटनास्थळी येवून आश्वासन दिल्याने हे आंदोलन तुर्त मागे घेण्यात आले.

उन्हाळा सुरु होण्याआधीच शहरात पाणी टंचाई जाणवून लागली आहे. ऐरव्ही शहरातील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. हे नित्याचेच बनले आहे. मात्र देवपूरातील बहुतांशी भागात 12 दिवस उलटूनही पाणी न आल्याने नागरिक संतप्त झालेत.

प्रभाग 3 मधील नागरिकांनी नगरसेवकांकडे गार्‍हाणे मांडले त्यामुळे संतापलेले नगरसेवक सईद बेग, कैसर अहमद व गणी डॉलर यांनी नवरंग जलकुंभावर चढून शोलेस्टाईल आंदोलन सुरु केले. पाणी येईपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतली.

त्यानंतर मनपाचे शहर अभियंता कैलास शिंदे यांनी तिनही नगरसेवकांची भेट घेत पाणी सोडण्याबद्दलच्या तांत्रिक अडचणी सांगितल्या. त्यानंतर असे होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर या नगरसेवकांनी तूर्त आंदोलन मागे घेतले आहे. शहरातील नागरिकांना पाणी समस्या भेडसावत असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी या नगरसेवकांनी केली होती.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!