Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

वजन घटतंय, अन् भावही वाढेनात !

Share

पांढर्‍या सोन्याच्या वेचणीसाठी क्विंटलला मोजावे लागतात हजार ते बाराशे

सलाबतपूर (वार्ताहर)– ‘वजनही घटतंय, अन् भावही वाढेनात’ अशी शेतकर्‍यांची अवस्था सध्या पांढर्‍या सोन्यानं केली आहे. तालुक्यातील सलाबतपूर व परिसरात यावर्षीच्या पर्जन्य आपत्तीनंतर शेतकर्‍यांच्या हाताशी आलेल्या थोड्याफार कापसाला बर्‍यापैकी भाव मिळेल अशी आशा अजूनही शेतकर्‍यांना आहे.

मात्र तसे संकेत मिळत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे तर भाव मिळेना म्हणून शेतकर्‍यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. सध्या कापूस उत्पादकांपेक्षा कापूस वेचणारे मजूर ‘तुपाशी’ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

यंदा शेतकर्‍यांवर अस्मानी संकट व कापूस चोरांच्या भितीने मिळेल ते उत्पादन पदरात पाडण्याच्या शेतकर्‍यांच्या कसरतीत मात्र कापूस वेचणारे मजूर चांगलाच भाव खाऊन गेल्याचे दिसते.

सध्या परिसरात कापूस वेचणी करण्यासाठी मजुरांची ने-आण करण्यापासून एक किलो कापूस वेचणीला दहा ते बारा रुपये भाव द्यावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना फक्त वेचणीला क्विंटलला हजार ते बाराशे रुपये खर्च करावे लागत आहेत तर दुसरीकडे विक्रीला केवळ चार ते साडेचार हजार रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित जुळेनासे झाले आहे.

जगाचा पोशिंदा म्हणविणार्‍या या शेतकर्‍यांनी आपल्याला न्याय मिळण्यासाठी ज्यांना निवडून दिले त्यांनी सत्तेच्या चाव्या आपल्याकडे याव्यात म्हणून सारीपाटाचा खेळ सुरू केला. सरकारच नसल्याने शेतकर्‍यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याने जनतेच्या मनातील सरकार नव्हे तर जनतेच्या मनात सध्या संताप व्यक्त होताना दिसत आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!