Wednesday, April 24, 2024
Homeधुळेकापसाचा ट्रक आगीत खाक

कापसाचा ट्रक आगीत खाक

धुळे  – 

कापसाने भरलेला ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हायटेन्शन वीज तारेला ट्रकचा स्पर्श झाल्याने कापसाने पेट घेतला. ही घटना आज दुपारी सुरत बायपास महामार्गावर घडली. यात ट्रकचा सहचालक जागीच ठार झाला तर ट्रकचा चालक जखमी झाला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, सुरत बायपास महामार्गाने आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास कर्नाटक येथून कापूस घेवून ट्रक (क्र.जीजे 03 एझेड 3938) हा गुजरात राज्याकडे जात असतांना सेवादास मंदिराजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला गेला.

त्या ठिकाणी असलेल्या उच्च दाब वीज तारा लोंबकळत असल्याने त्या तारांना ट्रकचा स्पर्श झाला. त्यामुळे शार्टसर्किट होवून ट्रकमधील कापसाने पेट घेतला.

त्यामुळे आग पसरली. आगीच्या ज्वाला 20 ते 25 फुट उंच गेल्याने धुराचा लोळ सर्वत्र पसरला. महामार्गावर अचानक ट्रकने पेट घेतल्यामुळे सदर माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली.

घटनास्थळी दोन बंब दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. यात ट्रकचा सहचालक जागीच ठार झाला तर चालक जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातात ठार झालेल्या सहचालकाचे नाव समजू शकले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या